सप्तशृंग गडावर तीन मिनिटांत पोहोचणे शक्य
By Admin | Updated: May 3, 2016 04:15 IST2016-05-03T04:15:55+5:302016-05-03T04:15:55+5:30
आदिशक्ती श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन आता अधिक सुलभ होणार असून गडावर जाण्यासाठी फ्युनिक्यूलर ट्रॉली उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. त्यांची चाचणी घेण्यास

सप्तशृंग गडावर तीन मिनिटांत पोहोचणे शक्य
सप्तशृंगगड (वणी) : आदिशक्ती श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन आता अधिक सुलभ होणार असून गडावर जाण्यासाठी फ्युनिक्यूलर ट्रॉली उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. त्यांची चाचणी घेण्यास सुरुवात झाली असून केवळ तीन मिनिटांत गडावर पोहोचणे शक्य होणार आहे.
संपूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या ट्रॉलीची चाचणी घेण्यासाठी परदेशातून अभियंते बोलविण्यात आले आहेत. सुमारे महिने ट्रॉलीची चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती सुयोग गुरुबक्षाणी कंपनीचे व्यवस्थापक राजू लुंबा यांनी दिली. फ्युनिक्यूलर ट्रॉली हा देशातील पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. त्यामुळे महिला, अपंग व वृद्ध भाविकांची गैरसोय थांबेल व त्यांचा मंदिरापर्यंतचा प्रवास सुखकर आणि अवघ्या तीन मिनिटांत होणार आहे.सध्या गडावर जाण्यासाठी भाविकांना ५५० पायऱ्या चढाव्या लागतात. १.५ मीटर रुंदीची ही ट्रॉली २५० मीटर लांबीच्या रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रेनसारखी असणार आहे. आपतकालीन परिस्थितीत प्रवाशांना उतरण्यासाठी रुळाच्या एका बाजूने पायऱ्यांची व्यवस्था आहे. कोकण रेल्वेच्या धर्तीवर येथे संरक्षणाची सोय करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)