देसाई हत्येप्रकरणी रेखाचित्रे जारी
By Admin | Updated: October 27, 2014 02:38 IST2014-10-27T02:38:57+5:302014-10-27T02:38:57+5:30
अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी मित्रांमध्ये झालेल्या वादात इव्हेंट मॅनेजर धैर्यशील देसाई यांची दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याच राहत्या घरात हत्या केली होती

देसाई हत्येप्रकरणी रेखाचित्रे जारी
मुंबई : अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी मित्रांमध्ये झालेल्या वादात इव्हेंट मॅनेजर धैर्यशील देसाई यांची दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याच राहत्या घरात हत्या केली होती. या गोळीबारात धैर्यशील यांचा मित्र संदीप कावा जखमी झाला आाहे. त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांनी दिलेल्या माहितीवरून मारेकऱ्यांची रेखाचित्रे तयार केली आहेत. मात्र अद्याप मारेकऱ्यांचा सुगावा लागलेला नाही.
धैर्यशील देसाई व संदीप कावा हे दोघे इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करतात. गुरुवारी संध्याकाळी दोघे देसाईच्या घरी दिवाळीनिमित्त पार्टी करीत बसले होते. त्यावेळी दोन अज्ञात इसमांनी घरात प्रवेश करून दोघांवर गोळ््या झाडल्या. या गोळीबारात धैर्यशील मरण पावला, तर संदीप गंभीर जखमी झाला. कावाचे नाव घेऊन हल्लेखोर घरात घुसले होते. व्यावसायिक वादातून हत्या झाली का, या दिशेने डी. एन. नगर पोलीस तपास करीत आहेत.
(प्रतिनिधी)