इस्थेर प्रकरणी आरोपांचा मसुदा सादर

By Admin | Updated: July 16, 2014 03:23 IST2014-07-16T03:23:27+5:302014-07-16T03:23:27+5:30

इस्थेर अनुह्या खून प्रकरणी सरकारी पक्षाने आरोपी चंद्रभाग सानप विरोधातील आरोपांचा मसुदा मंगळवारी सत्र न्यायालयात सादर केला़

Issue of Draft of Inhaler Case | इस्थेर प्रकरणी आरोपांचा मसुदा सादर

इस्थेर प्रकरणी आरोपांचा मसुदा सादर

मुंबई : इस्थेर अनुह्या खून प्रकरणी सरकारी पक्षाने आरोपी चंद्रभाग सानप विरोधातील आरोपांचा मसुदा मंगळवारी सत्र न्यायालयात सादर केला़
खून, बलात्कार, अपहरण यासह विविध आरोपांचा समावेश यात आहे़ मात्र यावर युक्तिवाद करण्यास वेळ द्यावा, अशी विनंती आरोपी सानपचे वकील प्रकाश साळशिंगीकर यांनी केली़ ती मान्य करत न्यायालयाने ही सुनावणी ३१ जुलैपर्यंत तहकूब केली़ त्याच दिवशी सानपवर आरोप निश्चितीही होणार आहे़
हैदराबाद येथून निघालेली इस्थेर मुंबईला न पोहोचल्याने एकच खळबळ उडाली होती़ त्यानंतर तिचा मृतदेह सापडला़ मात्र आरोपीचा शोध लागत नव्हता़ अखेर कुर्ला रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने सानप सापडला़ त्याच्याविरोधात मे महिन्यात आरोपपत्रही दाखल करण्यात आले़ (प्रतिनिधी)

Web Title: Issue of Draft of Inhaler Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.