शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘जुनी पेन्शन योजना’ ठरतेय चर्चेचा मुद्दा

By admin | Updated: January 28, 2017 05:54 IST

राज्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, ही मागणी शिक्षक मतदार संघात प्रचाराचा मुद्दा ठरला आहे.

मुंबई : राज्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, ही मागणी शिक्षक मतदार संघात प्रचाराचा मुद्दा ठरला आहे. शिक्षक परिषदेने या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतल्याने शिक्षणमंत्र्यांची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे.शिक्षक परिषदेचे उमेदवार वेणुनाथ कडू यांनी विविध शाळांमध्ये संवाद साधताना हा मुद्दा उचलून धरला आहे. जुन्या पेन्शनसाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे कडू यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, १० डिसेंबर २०१६ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी शिक्षकांनी धरणे दिले होते. त्यावेळी नागपूरचे शिक्षक आमदार नागोजी गाणार यांचा अपवाद वगळता राज्यातील एकही शिक्षक आमदार या आंदोलनाकडे फिरकला नव्हता. यावरून शिक्षकांच्या प्रश्नांबाबत विद्यमान शिक्षक आमदार गंभीर नसल्याचे म्हणत कडू यांनी बंडखोर उमेदवार रामनाथ मोते यांना चिमटा काढला. २००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही कडू यांनी सांगितले.