शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) ‘चांद्रयान-२’ मोहिमेला एप्रिल अखेरचा मुहूर्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 19:42 IST

चांद्रयान २ यानाचे वजन जवळपास ३ हजार २९० किलो आहे. यासाठी सुमारे ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

ठळक मुद्देचांद्रयान १ मोहिमेमध्ये चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाचा शोध

पुणे : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चांद्रयान २ या महत्वाकांक्षी मोहिमेला मुहूर्त मिळाला आहे. या मोहिमेतील यानाचे एप्रिल अखेरीस उड्डाण होईल. याबाबतची तयारी सुरू असल्याची माहिती इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित अवकाश विज्ञानाशी संबंधित परिषदेदरम्यान सिवन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मागील काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे ही मोहिम सातत्याने पुढे ढकलली जात आहे. चंद्राच्या दक्षिण धु्रवाकडील प्रदेशात हे यान उतरविण्याचे उद्दिष्ट आहे. चांद्रयान १ मोहिमेमध्ये चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाचा शोध लागला होता. चांद्रयान २ मोहिमे अंतर्गत त्याचा अधिक खोलवर अभ्यास केला जाणार आहे. सिवन म्हणाले, या मोहिमेसाठीची आवश्यक चाचण्या सध्या सुरू आहेत. एप्रिल अखेरीस आम्ही यान सोडण्यासाठी सज्ज असू. चांद्रयान २ यानाचे वजन जवळपास ३ हजार २९० किलो आहे. यासाठी सुमारे ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक अनिल भारद्वाज यांनी परिषदेमध्ये चांद्रयान २ बाबत सादरीकरण केले. ते म्हणाले, चांद्रयान २ मध्ये ‘लँडर’चा समावेश असेल. त्याद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर यान व्यवस्थितपणे उतरू शकेल. तसेच ‘रोव्हर’ला उतरविले जाईल. रोव्हरच्या माध्यमातून पृष्ठभागाचा अभ्यास केला जाईल. मुख्य यान (ऑर्बिटर) चंद्राभोवती फिरून पृष्टभागाचा ‘थ्री डी’ नकाशा तयार करेल. हा भौगोलिक अभ्यास करण्याबरोबरच चांद्रयान २ मध्ये काही नवीन तंत्रज्ञानाचीही चाचणी घेतली जाणार आहे. त्याचा भविष्यातील मोहिमांसाठी फायदा होईल. -----------------

टॅग्स :Puneपुणेisroइस्रोChandrayaan 2चांद्रयान-2