आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये इस्रायली तंत्रज्ञान
By Admin | Updated: October 8, 2015 02:12 IST2015-10-08T02:12:58+5:302015-10-08T02:12:58+5:30
यवतमाळ व उस्मानाबाद या दोन आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत इस्रायलच्या अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी व या जिल्ह्यांमध्ये तातडीने वीज जोडण्या द्याव्यात, असे निर्देश

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये इस्रायली तंत्रज्ञान
मुंबई : यवतमाळ व उस्मानाबाद या दोन आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत इस्रायलच्या अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी व या जिल्ह्यांमध्ये तातडीने वीज जोडण्या द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत घेतला. आत्महत्यांचे प्रमाण रोखण्यासाठी इस्रायलच्या कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती विकास, प्रक्रि या उद्योग आणि विपणन असा सर्वसमावेशक प्रकल्प यवतमाळ व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने सिंचन विहिरींची कामे तातडीने पूर्ण करावीत. असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येत आहे. मात्र या योजनेत पुरेशी रु ग्णालये सहभागी न झाल्याने शेतकरी आरोग्य सेवेपासून वंचित राहत असल्याच्या तक्र ारी आहेत. या योजनेंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. (विशेष प्रतिनिधी)