शैक्षणिक संशोधनात इस्रायल मदत करणार
By Admin | Updated: July 31, 2014 01:05 IST2014-07-31T01:05:07+5:302014-07-31T01:05:07+5:30
सैनिकी शाळेतील शिक्षणासह शिक्षणाच्या इतर क्षेत्रात संशोधन करण्यासाठी इस्रायल मदत करणार आहे. यासाठी पुणे, मुंबई आदी विद्यापीठांसाबेत याविषयी चर्चा सुरू असल्याची माहिती इस्रायल कॉन्सुलेट

शैक्षणिक संशोधनात इस्रायल मदत करणार
सैनिकी शाळेला इस्रायली पथकाची भेट
नागपूर: सैनिकी शाळेतील शिक्षणासह शिक्षणाच्या इतर क्षेत्रात संशोधन करण्यासाठी इस्रायल मदत करणार आहे. यासाठी पुणे, मुंबई आदी विद्यापीठांसाबेत याविषयी चर्चा सुरू असल्याची माहिती इस्रायल कॉन्सुलेट जनरलचे डेप्युटी चीफ आॅफ मिशन मतान जमीर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.
जमीर यांनी बुधवारी नागपूरच्या भोसला सैनिकी शाळेला तसेच इस्रायलच्या कृषी केंद्राला भेट दिली. त्यानंतर रविभवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.भारतातील सैनिकी शाळेत शिकवण्यात येणारे अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रात दोन देशात आदानप्रदान वाढावे यासाठी आपले प्रयत्न आहे. इस्रायलमध्ये शिक्षणाचा दर्जा उच्च आहे. जगातील पहिल्या आठ विद्यापीठापैकी तीन इस्रायलमध्ये आहे. एकूण उत्पन्नाच्या साडेसात टक्के खर्च शिक्षणावर करण्यात येतो. शिक्षणही इतर देशाच्या तुलनेत स्वस्त आहे. मात्र शिक्षणासाठी अमेरिका, इंग्लंड, जर्मनीमध्ये जाण्याकडे युवकांचा कल अधिक आहे. इस्रायलमध्ये शिक्षणाचे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न सुरू असूून त्यासाठी सैनिकी शिक्षण आणि इतर अभ्यासक्रमात संशोधन करण्यासाठी इस्रायल मदत करणार आहे. यासाठी ग्रामीण व शहरी भागातील अनेक शाळांना भेट देण्यात आली व अनेक विद्यापीठांशी चर्चाही करण्यात आली. पुण्यात दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यात १५० शिक्षक उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले.
इस्रायलच्या माध्यमातून भारतात कृषी क्षेत्रात चांगले काम सुरू आहे. भारतात २८ केंद्र उभारण्यात आले असून त्यापैकी एक नागपुरात आहे. या केंद्राचे कार्य समाधानकारक आहे,असे जमीर म्हणाले. दूध उत्पादन क्षेत्रात इस्रायल जगात पहिल्या क्रमांकावर असून तेथील एक गाय ४२ लिटर दूध देते. मात्र नैसर्गिक संसाधनात हा देश मागे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी शैलेश जोगळेकर, तरुण पटेल, दिलीप चव्हाण व राहुल चौरसिया उपस्थित होते.(प्रतिनिधी)