शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या नावाचा गैरवापर करणारी टोळी तर मंत्रालयात नाही ना ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 09:34 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निघाले होते सहा अभियंत्यांच्या बदलीचे आदेश

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून, त्याची राज्य शासनाने गंभीरतेने दखल घेऊन पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यापूर्वीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खासगी सचिवांच्या  नावे बनावट ई-मेल खाते तयार करून त्याद्वारे विद्युत विभागाशी संबंधित सहा अभियंत्यांच्या बनावट बदलीचे आदेश विद्युत विभागाला धाडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या आदेशासाठी फडणवीस यांच्या नावाच्या पत्रावर त्यांच्या बनावट सह्यादेखील हाेत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंत्र्यांच्या  नावाचा गैरवापर करून आपले इप्सित साध्य करणारी एखादी टोळी सक्रिय असावी, असा संशय व्यक्त आहे. 

फडणवीस यांच्या खासगी सचिवांचे बनावट ई-मेल खाते उघडल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन गृह विभागाने शासकीय कामकाजासाठी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व त्यांच्या अखत्यारीत कार्यरत असणाऱ्या कार्यालयांनी अधिकृत ई-मेल व ई-ऑफिससारख्या शासनमान्य प्लॅटफार्मचाच वापर करावा असे निर्देश १२ फेब्रुवारी रोजी अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले होते,  अशी माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचादेखील तसाच गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराचा तपास सुरू असून,  कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी विधानसभेत दिली.

  काय होते निर्देश ?  शासकीय विभागांनी व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांनी एकमेकांशी पत्रव्यवहार करण्यासाठी व इतर व्यवहारांसाठी  नॅशनल  इन्फाॅर्मेटिक्स सेंटर (NIC) द्वारे अधिकृत केलेल्या gov.in/nic.in या डोमेन नेम (Domain name) चा  वापर तयार  केलेल्या ई-मेलद्वारे शासकीय कामकाजासाठी करावा.  अधिकृत पत्रव्यवहार, कार्यालयीन व्यवहारांसाठी ई-ऑफिस व तत्सम स्थापित सरकारी प्लॅटफार्मचा वापर करावा. Gmail, Yahoo यासारख्या खासगी सेवा प्रदात्यांकडून ई-मेल आयडीद्वारे प्राप्त झालेल्या कोणत्याही शासकीय कामकाजाची माहिती अधिकृत मानली जाणार नाही. त्यामुळे अशा खासगी सेवा प्रदात्यांचा वापर शासकीय कामकाजासाठी करू नये. या बाबींची सर्व शासकीय विभागांनी व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांनी काटेकोर अंमलबजावणी करावी. जेणेकरून बनावट लेटरहेड तयार करून बनावट सह्या वापरण्याचे गैरप्रकार टाळता येतील, असे आधेश उपमुख्यमंत्र्यांच्या नावाच्या गैरप्रकारावेळी दिले असतानाही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही व शिक्का असलेली निवेदने निघाली आहेत.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय