ISIS संशयित इस्माईलची चौकशी करुन सुटका
By Admin | Updated: April 8, 2016 11:50 IST2016-04-08T11:50:03+5:302016-04-08T11:50:37+5:30
दहशतवादी संघटना इस्मालिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरियाशी (इसिस) संबंध असल्याच्या संशयावरुन ताब्यात घेण्यात आलेल्या इस्माईलची चौकशी करुन सोडून देण्यात आलं आहे
_ns.jpg)
ISIS संशयित इस्माईलची चौकशी करुन सुटका
>डिप्पी वंकाणी -
मुंबई, दि. ८ - दहशतवादी संघटना इस्मालिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरियाशी (इसिस) संबंध असल्याच्या संशयावरुन ताब्यात घेण्यात आलेल्या इस्माईलची चौकशी करुन सोडून देण्यात आलं आहे. इस्माईल विमानाने दुबईला जात असताना त्याला मंगळवारी पुणे विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. चौकशी केली असता इस्माईल हा फक्त मध्य पुर्वमधील तस्कर आणि हवाला ऑपरेटर्ससाठी सोने आणि पैसे घेऊन जाण्याच काम करत असल्याची माहिती समोर आली.
इस्माईल आपल्या दुबईतील चुलत भाऊ शफी अम्मार उर्फ युसूफच्या संपर्कात आल्यानंतर तपासयंत्रणांच्या रडारवर होता. इस्माईल इसीसचा ऑपरेटीव्ह असल्याचा संशय होता. शफी अम्मार उर्फ युसूफने इसिसने भरती केलेल्या 14 जणांना प्रशिक्षण दिलं होतं ज्यांना अटक करण्यात आली होती. लोकमतला अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अम्मारचे सर्व नातेवाईक सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.
आयबी, एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसने इस्माईलची चौकशी केली. चौकशीत इस्माईल अनेकदा दुबईला प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. भारतातून जाताना हवाला ऑपरेटरसाठी इस्माईल पैसे घेऊन जायचा आणि त्याबदल्यात त्याचा विमान प्रवास खर्च केला जायचा. दुबईत गेल्यानंतर तिथे काही महिने तो काम करायचा आणि त्यानंतर परत येतेवेळी तस्करांकडून सोने विकत घ्यायचा. यासाठीदेखील त्याचा प्रवास खर्च केला जायचा आणि कमिशनही दिलं जायचं. तीन महिन्यापुर्वी त्याला गोवा विमानतळावर सोने घेऊन जात असल्याने अटकही झाली होती.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे इस्माईल अम्मारच्या चुलत भावांसाठी काम करत होता. तपास यंत्रणांना संशय होता की जे पैसे इस्माईल घेऊन जात आहे ते इसिसच्या ऑपरेटीव्हना पोहोचवले जात आहेत. मात्र चौकशीत असं काहीच न आढल्याने त्याची सुटका करण्यात आली. अम्मारचे सर्व नातेवाईक तसंच ज्यांच्याशी संपर्क साधला जात आहे ते सर्व रडारवर आहेत. तरुणांना भरती करुन घेण्यासाठी तसंच भारताविरोधी कारवाई करण्यासाठी आर्थिक तयारी केली जात आहे याचाच आम्ही तपास करत असल्याची माहिती अधिका-याने दिली आहे.