इस्थेर अनुह्या हत्याकांड येत्या आठवडयात आरोपपत्र ?

By Admin | Updated: May 24, 2014 00:01 IST2014-05-23T22:45:30+5:302014-05-24T00:01:52+5:30

हैद्राबादहून मुंबईला परतलेल्या इस्थेर अनुह्या या २३वर्षीय इंजिनिअर तरूणीची शारिरिक अत्याचारानंतर निघृर्णपणे हत्या करणार्‍या आरोपी चंद्रभान सानपविरोधात गुन्हे शाखा येत्या आठवडयात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता

Isher's mutual killings charged in the coming week? | इस्थेर अनुह्या हत्याकांड येत्या आठवडयात आरोपपत्र ?

इस्थेर अनुह्या हत्याकांड येत्या आठवडयात आरोपपत्र ?

मुंबई। दि. २३ (प्रतिनिधी) -
हैद्राबादहून मुंबईला परतलेल्या इस्थेर अनुह्या या २३वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीची शारिरिक अत्याचारानंतर निघृर्णपणे हत्या करणार्‍या आरोपी चंद्रभान सानपविरोधात गुन्हे शाखा येत्या आठवडयात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे.
मुळची हैद्राबाद, विजयवाडाची रहिवासी असलेली अनुह्या मुंबईतील टीसीएस कंपनीत काम करत होती. नाताळच्या सुटीत ती गावी गेली होती. सुटी संपवून ५ जानेवारीला पहाटे पाचच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनन्सवर उतरली. मात्र तेथून ती बेपत्ता झाली. पुढे १६ जानेवारीला पूर्वद्रुतगती मार्गावर, भांडुपेश्वर कुंडाजवळील निर्जन झाडीत तिचा कुजलेला मृतदेह आढळला. तिच्या हत्येचा गुंता सोडविण्यासाठी स्थानिक पोलीस, राज्य रेल्वे पोलीस आणि गुन्हे शाखा धडपडत होत्या. अखेर एसीपी प्रफुल्ल भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील जबरीचोरी व दरोडाविरोधी पथकाने अत्यंत शिताफीने आरेापी चंद्रभानला गजाआड केले होते.
टर्मिनन्सवर उतरल्यानंतर अनुह्या वेटींगरूमच्या शोधात होती. तिच्या हालचालींवरून ती शहरात नवी आहे हे स्पष्ट होत होते. तीला बघताच गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या चंद्रभानने तिला गाठले. मॅडम तुम्हाला कुठे जायचे आहे, माझ्याकडे टॅक्सी आहे, तीनशे रूपयात अंधेरीला सोडेन, असे आमीष दाखवले. त्यावर घाबरू नका, माझा फोन नंबर, नाव, गाडीचा नंबर पालकांना कळवा. विश्वास ठेवा मी तुम्हाला फसवणार नाही, अशी गळही घातली. प्रवासाचा क्षीण असल्याने अनुह्याने त्याला होकार दिला. मात्र टर्मिनन्सच्या पार्किर्ंग लॉटमध्ये पोहोचताच चंद्रभानकडे टॅक्सी नसून बाईक आहे हे अनुह्याला समजले. तीथे तीने चंद्रभानला पुढील प्रवासासाठी नकार दिला. पण तेव्हाही, अहो मॅडम मी तुम्हाला माझी सर्व माहिती दिलेली आहे. विश्वास ठेवा मी तुम्हाला फसवणार नाही. मीही त्याच दिशेला चाललो आहे, अशी थाप चंद्रभानने मारली. ही धोक्याची घंटा अनुह्या ओळखू शकली नाही. ती चंद्रभानसोबत बाईकवरून निघाली. संधी मिळताच चंद्रभानने बाईक भांडुपेश्वर कुंडाजवळ नेली. तेथे तिच्यावर अत्याचार केले व नंतर हत्या. गुन्हे शाखेच्या पथकाला चंद्रभानसोबत टर्मिनन्स सोडणार्‍या अनुह्याचे सीसीटीव्ही चित्रण मिळाले होते. त्यावरून खबर्‍यांच्या जोरावर गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती.
आरोपपत्रात अनाहुतपणे अनुह्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आरोपी चंद्रभानची मदत करणार्‍या नंदकिशोर साहू याची साक्ष महत्वाचा पुरावा म्हणून सहभागी करण्यात आल्याचे समजते. त्यासोबत अनुह्या आणि चंद्रभान यांना टर्मिनसहून बाहेर पडताना पाहणार्‍यांच्या साक्षी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. हत्येनंतर त्रंबकेश्वरला जाऊन चंद्रभानने एका ज्योतीषाला आपली जन्मपत्रिका दाखवली होती. ज्योतीषाच्यासल्ल्यानुसार चंद्रभानने कालसर्प योगाची शांतीही करून घेतली होती. त्या ज्योतीषालाही साक्षीदार करण्यात आल्याची माहिती मिळते.

Web Title: Isher's mutual killings charged in the coming week?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.