शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2024: नवे सरकार कधी स्थापन होणे गरजेचे? केवळ विधानसभा गठित होणे अनिवार्य

By यदू जोशी | Updated: November 21, 2024 08:49 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: निकालानंतर सरकार स्थापनेपर्यंतची प्रक्रिया काय असेल हे जाणून घेतले तर अधिक स्पष्टता येईल.

यदु जोशी, मुंबई Maharashtra Election 2024: सध्याच्या १४व्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार असल्याने त्यापूर्वी नवे सरकार राज्यात स्थापन होणे अनिवार्य आहे, असे म्हटले जात असले तरी ती वस्तुस्थिती नाही. संवैधानिकदृष्ट्या विचार केला तर २६ पूर्वी नवे सरकार येणे हे अनिवार्य नाही. केवळ त्यापूर्वी विधानसभा गठित व्हावी लागेल.

निकालानंतर सरकार स्थापनेपर्यंतची प्रक्रिया काय असेल हे जाणून घेतले तर अधिक स्पष्टता येईल. निकालाच्या दिवशी वा दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी हे भारतीय लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम ६३ नुसार विधानसभा गठित झाल्यासंदर्भातील अधिसूचनेचा मसुदा राज्यपालांकडे सादर करतील. 

राज्यपाल त्यावर राजपत्र जारी करण्यास अनुमती देतील आणि मग एका राजपत्रानुसार   १५वी विधानसभा गठित होईल. ही प्रक्रिया मात्र २६ नोव्हेंबरपूर्वी करावी लागणार आहे. त्यानंतर कोणीही वा दोघेही सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे सादर करू शकतील. 

विधानमंडळाचे दीर्घकाळ सचिव राहिलेले अनंत कळसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा पाठिंबा देणाऱ्या विधानसभा सदस्यांच्या स्वाक्षरी पत्रांसह करावा लागेल. २८८ पैकी १४५ इतके बळ बहुमतासाठी आवश्यक असेल. नेता कोण असणार तेही नमूद करावे लागेल. त्या नेत्याला मुख्यमंत्रिपदासाठी व सरकार स्थापनेस राज्यपाल आमंत्रित करतील. त्यापूर्वी राज्यपाल सदस्यांच्या पाठिंब्याची शहानिशा करू शकतील. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर विधानसभेचे पहिले अधिवेशन होईल. यात आमदारांचा शपथविधी होईल. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विधानसभेचा कार्यकाळ असेल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीvidhan sabhaविधानसभा