शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील वाद संपला? 'मातोश्री'वर काय घडलं? चंद्रकांत खैरेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 18:45 IST

खैरे म्हणाले, अंबादास दानवे आणि मी हातात हात घेऊन प्रचार करणार आहोत.

अंबादास दानवे आणि मी हातात हात घेऊन प्रचार करणार आणि उद्धव साहेबांना रिझल्ट देणार, असे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. आज त्यांनी मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर ते माध्यमांसोबत बोलत होते. खरे तर, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात नाराजी असल्याची चर्चा आहे. या बैठकीत दानवे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते.   पत्रकारांसोबत बोलताना खैरे म्हणाले, अंबादास दानवे आणि मी हातात हात घेऊन प्रचार करणार आहोत. यावेळी, साहेबांशी बोलणे झाले का? असा प्रश्न विचारला असता खैरे म्हणाले, हो झाले. या भेटीवेळी दानवे बरोबर होते का? असे विचारले असता खैरे म्हणाले, नाही, टेलिफोनिक चर्चा झाली. मग नाराजी दूर झाली का? असे विचारले असता, हो झाली. आता आम्ही दोघेही हातात हात घेऊन काम करणार आणि उद्धव साहेबांना रिझल्ट देणार, असे खैरे यांनी म्हटले आहे.

"जलील आता काहीच नाही, संपला तो" -छत्रपती संभाजीनंगरमध्ये महायुतीने अद्यापही उमेदवार दिलेला नाही, यासंदर्भात बोलताना, भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटातात भांडण सुरू झाले आहे. दोघेही म्हणत आहेत आम्हाला द्या आम्हाला द्या. त्यांच्यातच भांडण सुरू झाले आहे. यावेळी, आपल्याला काय वाटते, कोण असेल आव्हानात्मक जलील असतील की...? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता, खैरे म्हणाले, "जलील आता काहीच नाही, संपला तो. यामुळे तो परवापासून एकदम शांत बसला आहे. मात्र येथे काही असले तरी, आमच्या विरोधात कुणीही असले तरी, आपण त्याला खूप मोठे समजायचे की नाही? आणि पाडायचे. ही भूमिका ठेवायची."

याच वेळी, वंचित संदर्भात बोलताना, वंचित नसले तरी आमचे बरेच मित्र तेथे आहेत. त्यांच्यासोबत आमची चर्चाही सुरू आहे, असेही खैरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेAmbadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरे