मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा बीजारोपण

By Admin | Updated: July 2, 2016 02:55 IST2016-07-02T02:55:11+5:302016-07-02T02:55:11+5:30

‘प्रदूषण रोखण्यासाठी समृद्ध वने हाच उपचार... प्रवासा दरम्यान बीजारोपणाचा स्वीकारू नवा विचार’ या घोषवाक्यासह महामार्गावर बीजारोपण मोहीम राबविण्यात आली.

Irrigation between the Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा बीजारोपण

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा बीजारोपण


पनवेल : ‘प्रदूषण रोखण्यासाठी समृद्ध वने हाच उपचार... प्रवासा दरम्यान बीजारोपणाचा स्वीकारू नवा विचार’ या घोषवाक्यासह महामार्गावर बीजारोपण मोहीम राबविण्यात आली.
‘लोकमत’ने व्ही. जे. पाटील एज्युकेशन फाऊंडेशन, खिडकी अलिबाग व वैभव आॅटोमोबाईल, डीलर्स भारत पेट्रोलियम कोळखे यांच्या सौजन्याने शुक्रवारी पळस्पे येथे आयोजित बीजारोपण मोहिमेत माजी आमदार विवेक पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
वनमहोत्सवानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र वृक्षारोपण मोहिमेला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली. महामार्गाच्या दोन्ही बाजूस बीजाचे रोपण केल्यास महिनाभरात नवीन रोपटी याठिकाणी उगवतील व निसर्गाचा समतोल राखला जाईल. हाच विचार करून लोकमतने बीजारोपणाचा उपक्रम राबवून महामार्गावरील वाहन चालकांना बियाणांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी लोकमत मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, ग्रामपंचायत पळस्पेच्या सरपंच जयश्री भगत आदी उपस्थित होते.
>पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी, कृषी दिनाच्या औचित्याने राज्यात वृक्षलागवड करण्यात आली. त्यानिमित्त ‘लोकमत’च्या वतीने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा बीजवाटपाची मोहीम राबविण्यात आली.
>महाड : कृषीदिनी राज्यात दोन कोटी वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धन करण्याचा संकल्प राज्य शासनातर्फे केल्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ तर्फे मुंबई - गोवा महामार्गाच्या दुतर्फा बीजारोपण करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी महाडमधील हॉटेल विसावासमोर आ. भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.मुंबईकडे प्रवास करणाऱ्या खेड तालुक्यातील तिसंगी येथील प्रतीक्षा भोसले यांच्याकडे बीजारोपण करण्यासाठी बीज आ. भरत गोगावले यांच्या हस्ते सुपूर्द करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. अण्णासाहेब सावंत बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत, शिवाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष काळे, उपाध्यक्ष अ‍ॅड. विनोद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
बीजारोपणाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. राज्यात अशाप्रकारचा एकमेव उपक्र म असावा. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होऊन समतोल राखण्यास मदत होईल.
- विवेक पाटील, माजी आमदार

Web Title: Irrigation between the Mumbai-Goa highway