१५ एप्रिलपासून आयआरसीटीसी तिकीट बुकिंग सुरू करणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 05:55 PM2020-03-31T17:55:13+5:302020-03-31T17:55:31+5:30

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम ( आयआरसीटीसी ) च्या संकेतस्थळावर सर्व रेल्वेच्या तिकिटांची बुकिंग सेवा 15 एप्रिलपासून ...

IRCTC will start booking tickets from April 15 | १५ एप्रिलपासून आयआरसीटीसी तिकीट बुकिंग सुरू करणार 

१५ एप्रिलपासून आयआरसीटीसी तिकीट बुकिंग सुरू करणार 

googlenewsNext

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम (आयआरसीटीसी) च्या संकेतस्थळावर सर्व रेल्वेच्या तिकिटांची बुकिंग सेवा 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे.  त्यामुळे 15 एप्रिलपासून भारतीय रेल्वे सुरू होण्याची शक्यता आहे. 

२४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. परिणामी,  14 एप्रिलपर्यंत भारतीय रेल्वेकडून सर्व मार्गावरील रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र आयआरसीटीसी 15 एप्रिलपासून तिकीट बुकिंग सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर देशभरातील रेल्वे  सेवा पुर्णतः बंद करण्यात आली आहे. १४ एप्रिलपर्यंत सर्व प्रवासी रेल्वेची सेवा बंद असून फक्त मालगाड्या, पार्सल गाड्या सुरू आहेत.  14 एप्रिल रोजी लॉकडाऊन संपल्यावर १५ एप्रिलपासून सर्व भारतीय रेल्वेचे बुकिंग सुरू होणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकून राहिलेल्या प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. 

Web Title: IRCTC will start booking tickets from April 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.