इराणी टोळीचा पोलिसांवर हल्ला
By Admin | Updated: January 18, 2017 06:23 IST2017-01-18T06:23:38+5:302017-01-18T06:23:38+5:30
सोमवारी रात्री इराणी मोहल्ल्यात गेलेल्या श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकावर इराणी महिला-पुरुषांनी हल्ला केला.

इराणी टोळीचा पोलिसांवर हल्ला
श्रीरामपूर (अहमदनगर) : सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताला पकडण्यास सोमवारी रात्री इराणी मोहल्ल्यात गेलेल्या श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकावर इराणी महिला-पुरुषांनी हल्ला केला. यात एक पोलीस व इराणी टोळीतील एक जण जखमी झाला आहे.
शिवाजी अशोक ढाकणे असे जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी नसीम शमलखान इराणी, नीलोफर अब्बास इराणी, नज्जू इराणी, किट्टी युसूफ इराणी, परिया शमल इराणी, सीमा मुक्तार इराणी, नौबार मिस्कीन इराणी, शहना यासीन इराणी, अमना फतेह इराणी, मखमल सादक इराणी, सादिक शामलखान इराणी, जग्गू ऊर्फ जाकीर युसूफ इराणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी पोलीस व इराणी टोळीच्या झटापटीत सादिक इराणी हा आरोपीही जखमी असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.(प्रतिनिधी)