शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

इक्बाल कासकर अटक प्रकरण, आव्हाड पोलीस आयुक्तांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 05:26 IST

बिल्डरकडून खंडणी घेतल्याप्रकरणी अटकेत असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या पोलीस चौकशीत ठाण्यातील काही नगरसेवक आणि काही नेत्यांची नावे समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेतली.

ठाणे : बिल्डरकडून खंडणी घेतल्याप्रकरणी अटकेत असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या पोलीस चौकशीत ठाण्यातील काही नगरसेवक आणि काही नेत्यांची नावे समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेतली. त्या वेळी तुमचे यात कुणीही नाव घेतले नसल्याचा खुलासा आयुक्तांनी केल्याचे समजते.इक्बाल कासकरला खंडणीप्रकरणी अटक केल्यानंतर या प्रकरणात ठाण्यातील काही नगरसेवक आणि काही नेत्यांचा सहभाग समोर येत असल्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी जाहीर केले होते. काही वृत्तवाहिन्यांनी ठाण्यातील राष्टÑवादीच्या एका नेत्याचा तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निकटवर्तीयांचा यात सहभाग असल्याचे वृत्त दिल्याने सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी गुरुवारी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी तुमचे यात कुणीही नाव घेतले नसल्याचे परमबीर सिंग यांनी आव्हाडांना सांगितले. इक्बालच्या अटकेवर पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि त्यांच्या पथकाचे आव्हाड यांनी अभिनंदन केल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, दाऊद इब्राहिमशी आपले काही वर्षांपूर्वी बोलणे झाले. सध्या आपण त्याच्या संपर्कात नसल्याचा दावा इक्बाल कासकर याने पोलीस चौकशीत केला आहे. ठाणे-मुंबईतील आणखी कोणाकोणाकडे इक्बाल किंवा दाऊदच्या गँगने खंडणीची मागणी केली? ती कशाच्या स्वरूपात आहे? या टोळीमध्ये आणखी किती जण सक्रिय आहेत? यात स्थानिक पातळीवरील आणि दाऊदप्रमाणे परदेशातील आणखी कुणाचा समावेश आहे का? याबाबत स्वत: पोलीस आयुक्त परमवीर सिंग, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्याकडून चौकशी सुरू आहे. दाऊद आणि इक्बाल यांच्यात फोनद्वारे वारंवार संवाद झाल्याचा पोलिसांना संशय आहे. परंतु, ‘व्हीओआयपी’द्वारे (व्हाइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) हा संपर्क झाल्याची शक्यता असल्यामुळे बाहेरील कॉलही स्थानिक असल्याचे आढळून येते. त्यामुळे पुरावे मिळवताना पोलिसांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या टोळीमध्ये मुंबई, ठाण्यातील अनेक जण सहभागी असल्याची माहिती पोलीस तपासात उघड होत आहे.इकबाल हा कोकेनपासून अनेक अमली पदार्थांच्या आहारी गेलेला आहे. याच कारणामुळे दाऊदची आपल्यावर नाराजी आहे. याच नाराजीमुळे दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये फोनवर किंवा प्रत्यक्ष बोलणे झाले नसल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केला.>दाऊद टोळीतील काही गुंडांची माहिती इक्बालकडून तपास पथकाला मिळाली आहे. त्यामुळे मुंबई परिसरातून आणखी तीन ते चार जणांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असेही अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले.