आयपीएस अधिका-यांच मुल्यमापन होणार ऑनलाइन
By Admin | Updated: April 8, 2016 12:55 IST2016-04-08T12:55:12+5:302016-04-08T12:55:12+5:30
आयपीएस अधिका-यांची मुल्यमापन प्रक्रिया आता ऑनलाइन होणार असून स्मार्ट परफॉर्मन्स अप्रेझल रिपोर्ट रेकॉर्डींग ऑनलाइन (स्पॅरो) या प्रोजेक्टअंतर्गत केलं जाणार आहे

आयपीएस अधिका-यांच मुल्यमापन होणार ऑनलाइन
>डिप्पी वंकाणी - लोकमत एक्स्क्लुझिव्ह
मुंबई, दि. ८ - आयपीएस अधिका-यांची मुल्यमापन प्रक्रिया आता ऑनलाइन होणार असून स्मार्ट परफॉर्मन्स अप्रेझल रिपोर्ट रेकॉर्डींग ऑनलाइन (स्पॅरो) या प्रोजेक्टअंतर्गत केलं जाणार आहे. केंद्रीय गृह विभागाने घेतलेल्या या निर्णयाचं अधिका-यांनी स्वागत केलं आहे. अधिकारी आणि त्यांच्या वरिष्ठांसाठी ज्यांना ठराविक वेळेत अधिका-यांच्या कामाची समीक्षा करायची आहे त्यांच्यासाठी वेळेचं बंधन असल्याने कामात पारदर्शकता निर्माण होईल असं मत अधिका-यांनी व्यक्त केलं आहे. ज्याप्रमाणे कामात प्रगती होत जाईल त्याप्रमाणे अधिका-यांना त्याचा ईमेलदेखील मिळणार आहे.
गेल्यावर्षीयपर्यंत अधिका-यांना आपल्या कामाकाजाचा लेखाजोखा कागदोपत्री जमा करावा लागत होता. आता मात्र त्यांना सक्तीने आपल्या कामाची माहिती ऑनलाइन स्पॅरो अंतर्गत जमा करावी लागणार आहे. अधिका-यांना यासाठी डिजीटल सिग्नेचर सर्टिफिकेटदेखील लागणार आहे ज्याचा मुल्यमापनाच्या सर्व कागदपत्रांवर वापर करणे सक्तीचं असेल.
अधिका-यांना आपली माहिती आयजीला 5 एप्रिलअगोदर पाठवण्यास सांगितलं आहे ज्याच्या मदतीने वैयक्तिक आयडी तयार केले जाणार आहेत. पासवर्ड मोबाईल फोनवर पाठवण्यात येणार आहेत ज्याच्या मदतीने अधिकारी स्पॅरोच्या www.IPS.gov.in वेबसाईटवर लॉग इन करु शकतात.
परफॉर्मन्स अप्रेझल रिपोर्टची पाहणी करण्यासाठी तसंच डीजीपींकडून मंजुरी मिळण्यासाठी वेळेची मर्यादा ठेवण्यात आली आहे. वरिष्ठांनी दिलेल्या शे-यावर जर अधिकारी सहमत नसेल तर तो आपला मुद्दा मांडू शकतो. याअगोदर अधिका-यांना आपल्या फाईलची माहिती मिळत नव्हती मात्र आता त्यांना प्रत्येक स्टेजला एसएमएस आणि ईमेल मिळणार आहे. आमची सर्व प्रक्रिया आता ऑनलाइन झाली आहे अशी माहिती वरिष्ठ आयपीएस अधिका-याने दिली आहे.