आयपीएल निकालावरून वृद्धाची केली फसवणूक
By Admin | Updated: June 8, 2017 03:49 IST2017-06-08T03:49:56+5:302017-06-08T03:49:56+5:30
एसएमएसद्वारे देऊन १० लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्याचा प्रयत्न एका ७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाच्या चांगलाच अंगलट आला
_ns.jpg)
आयपीएल निकालावरून वृद्धाची केली फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : ‘आयपीएल क्रि केट मॅचचा अंतिम सामना कोण जिंकणार?’ या प्रश्नाचे उत्तर एसएमएसद्वारे देऊन १० लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्याचा प्रयत्न एका ७० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाच्या चांगलाच अंगलट आला आहे. बक्षिसाची ही रक्कम मिळवण्यासाठी २५ हजार रुपयांचा टीडीएस भरण्यास सांगून या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आल्याची घटना कल्याण पश्चिमेत घडली आहे.
गोदरेज हिल भागात राहणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या मोबाइलवरील एसएमएसवर आयपीएल क्रि केट मॅचच्या दरम्यान ‘आयपीएल कोण जिंकेल?’ असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देणाऱ्यास १० लाख रुपये जिंकण्याची आॅफर देण्यात आली होती. त्या ज्येष्ठ नागरिकाने या एसएमएसला उत्तर दिल्यानंतर त्याच नंबरवरून ज्येष्ठ नागरिकाला आर.के. शर्मा याने फोन करत फायनल मॅचच्या निकालात तुमचा नंबर निवडला गेल्याचे सांगितले. तुम्हाला १० लाखांचे बक्षीस लागले आहे. मात्र, बक्षिसाचे पैसे तुमच्या खात्यावर जमा करण्यासाठी टीडीएस चार्ज भरावा लागेल, असे सांगितले. त्यावर, विश्वास ठेवत ज्येष्ठ नागरिकाने शर्मा याने दिलेल्या खात्यावर २५ हजार रु पये जमा केले. मात्र, त्यानंतर बक्षीस न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या ज्येष्ठ नागरिकाने खडकपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याआधारे गुन्हा दाखल झाला आहे.