प्रदेश काँग्रसचे गुलाम अलींना निमंत्रण

By Admin | Updated: October 10, 2015 02:08 IST2015-10-10T02:08:16+5:302015-10-10T02:08:16+5:30

शिवसेनेच्या विरोधानंतर प्रख्यात गझलगायक गुलाम अली यांचा मुंबईतला कार्यक्रम रद्द झाला असला तरी प्रदेश काँग्रेस कमिटीने गुलाम अलींना मुंबईत कार्यक्रमाचे आमंत्रण दिले आहे.

Invitation to Ghulam Ali of the State Congregation | प्रदेश काँग्रसचे गुलाम अलींना निमंत्रण

प्रदेश काँग्रसचे गुलाम अलींना निमंत्रण

मुंबई : शिवसेनेच्या विरोधानंतर प्रख्यात गझलगायक गुलाम अली यांचा मुंबईतला कार्यक्रम रद्द झाला असला तरी प्रदेश काँग्रेस कमिटीने गुलाम अलींना मुंबईत कार्यक्रमाचे आमंत्रण दिले आहे.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, अशा पद्धतीने कलावंतांचा आवाज दडपू दिला जाणार नाही. या आधी शाहरुख खानचा ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट प्रदर्शित करु देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. आमचे सरकार असताना तो चित्रपट प्रदर्शित झाला. याआधी गुलाम अलींचा कार्यक्रम मुंबईत झाला होता. तेंव्हा शिवसेनेने विरोध केला नव्हता. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना दुटप्पीपणे वागत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. आज प्रवक्ते सचिन सावंत हे गुलाम अलींशी दूरध्वनीवरुन बोलले. उद्या त्यांना रीतसर निमंत्रण देण्यात येईल, असे सावंत यांनी सांगितले.

Web Title: Invitation to Ghulam Ali of the State Congregation