‘सॅफरॉन’कडून गुंतवणूकदारांची दोन कोटींची फसवणूक
By Admin | Updated: June 23, 2014 04:21 IST2014-06-23T04:21:04+5:302014-06-23T04:21:04+5:30
सॅफरॉन कंपनीने केलेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणी रविवार सायंकाळपर्यंत शहर पोलिसांनी केलेल्या तपासानुसार १०० गुंतवणूकदारांकडून ‘सॅफरॉन’ने २ कोटी ११ लाख १ हजार २७० रुपये रक्कम स्वीकारल्याचे उघड झाले

‘सॅफरॉन’कडून गुंतवणूकदारांची दोन कोटींची फसवणूक
रत्नागिरी : सॅफरॉन कंपनीने केलेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणी रविवार सायंकाळपर्यंत शहर पोलिसांनी केलेल्या तपासानुसार १०० गुंतवणूकदारांकडून ‘सॅफरॉन’ने २ कोटी ११ लाख १ हजार २७० रुपये रक्कम स्वीकारल्याचे उघड झाले. दामदुप्पट योजनेंतर्गत लोकांना १० कोटी ६६ हजार रुपयांचे धनादेश कंपनीकडून दिल्याचेही स्पष्ट झाल्याचे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप मिसर यांनी सांगितले.
सॅफरॉन इंटरनॅशनल हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने लोकांना पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईत (मुलुंड) मुख्य सूत्रधार शशिकांत राणेला पोलिसांनी अटक केली आहे.
त्याला २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रत्नागिरीत याप्रकरणी शहर पोलिसांनी ऐश्वर्या गावकर (उत्कर्षनगर, कुवारबाव)
व रश्मी मांडवकर (नाचणे,
रत्नागिरी) या सॅफरॉनच्या रत्नागिरी कार्यालयात त्यावेळी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या दोन महिलांना अटक केली आहे. त्यांची पोलीस कोठडी सोमवारी संपत आहे. (प्रतिनिधी)