माळीणमधील गूढ स्फोटाची चौकशी करणार : आर. आर. पाटील

By Admin | Updated: August 2, 2014 23:17 IST2014-08-02T23:17:08+5:302014-08-02T23:17:08+5:30

माळीण येथील दुर्घटना घडत असताना मोठा आवाज झाला होता़ स्फोटासारखा आवाज झाल्याची माहिती स्थानिक नागरिक व घटनेतील जखमींनी दिली आह़े

Investigations on spurious explosions in Malinas: R. R. Patil | माळीणमधील गूढ स्फोटाची चौकशी करणार : आर. आर. पाटील

माळीणमधील गूढ स्फोटाची चौकशी करणार : आर. आर. पाटील

मंचर : माळीण येथील दुर्घटना घडत असताना मोठा आवाज झाला होता़ स्फोटासारखा आवाज झाल्याची माहिती स्थानिक नागरिक व घटनेतील जखमींनी दिली आह़े त्यामुळे यासंदर्भात तज्ज्ञामार्फत चौकशी केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री आऱ आऱ पाटील यांनी आज दिली़
माळीण येथे पाटील यांनी भेट दिली़ त्यानंतर त्यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली़ पराग डेअरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होत़े या वेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा आदी उपस्थित होत़े 
माळीण येथील घटना घडली, त्या वेळी विजांचा कडकडाट होत होता, पाऊस जास्त होता़ तेथील नागरिकांशी चर्चा करताना त्यांनी मोठा आवाज झाल्याची माहिती दिली. उपजिल्हा रुग्णालयातील जखमींनी आवाज झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आह़े त्यामुळे आता तज्ज्ञांमार्फत खातरजमा करणार आह़े माती अथवा दगड कसे ढासळे याबाबत तज्ज्ञ शोध घेतील, हा आवाज कशाचा होता, स्फोट झाला का, याबाबत तपास करणार असल्याचे पाटील म्हणाल़े
पडकई योजनेबाबत होणा:या चर्चेमुळे स्थानिक नाराज आहेत, असे सांगून गृहमंत्री आऱ आऱ पाटील म्हणाले, येथील शेतक:यांना दोन वेळचा घास देणारी ही योजना आह़े मुळात ज्या भागात कडा कोसळला, तेथे पडकई नव्हती़  पडकई योजना आदिवासींसाठी वरदान असून ती बंद करू नका, अशी मागणी माळीण भेटीत आदिवासी बांधवांनी केल्याचे पाटील यांनी सांगितल़े  (वार्ताहर)
 
माळीण येथे आज भेट दिली, त्या वेळी शासन तसेच विविध स्वयंसेवी संस्था अधिकारी समन्वय ठेवून चांगले काम करीत असल्याचे दिसल़े 4क् टक्के काम पूर्ण झाले असून, रोगराई पसरू नये त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत़ जखमींवर चांगले उपचार होत आहेत़
- आऱ आऱ पाटील, 
गृहमंत्री महाराष्ट्र राज्य
 
वारज्यातील घरांना भूस्खलनाचा धोका
 
4मोठय़ा प्रामाणात टेकडीफोड व डोंगरउतारावर (हिल स्लोप) बांधकामे झाल्याने वारजे भागातही माळीण गाव दुर्घटनेचे पुनरावृत्ती होऊ शकते, असा जाणकारारांचा अंदाज आहे. या भागात मुख्यत्वे तीन डोंगर (टेकड्या) आहेत. प्रभाग तीस मध्ये विठ्ठलनगर गोकूळनगर चा वरचा भाग, तसेच आकाशनगर कडून वर खाणी कडे जाणारे भाग (बीडीपी झोन) आणि तिसरा प्रभाग 31 मधील रामनगर वसाहतीचा काही भाग हा उंचवट्यावर आहे.
4प्रभाग 3क् मधील विठ्ठलनगर व गोकूळनगर हा संपूर्ण भाग बीडीपी त असुन या ठिकाणी परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात घरे बांधली गेली आहेत. त्यासाठी जमीन समप्रमाणात घरून घेण्यासाठी मोठ्या प्रामाणात जेसीबी लाऊन जमिनीची खोदाई करण्यात आली आहे. 
 
पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार 
मंचर : वने व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी आज मंचर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन माळीण दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. स्थानिक ग्रामस्थांशी बोलून पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. घरे तसेच संसारोपयोगी साहित्य दिले जाणार आहे. 
मंचर उपजिल्हा रुग्णालयात माळीण दुर्घटनेत वाचलेल्या सहा जखमींवर उपचार सुरु आहेत. पतंगराव कदम यांनी त्यांची भेट घेतली व या घटनेविषयी जाणून घेतले. पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले, ‘‘माळीण येथे प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरु ठेवले आहे. पावसाचा अडथळा आला नाही तर दोन दिवसांत काम संपेल अन्यथा 4 ते 5 दिवस लागतील. सरकारी यंत्रणा व स्वयंसेवी संस्था यांच्याकडून वाचलेल्या लोकांना भोजन व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. (वार्ताहर)
 
4ग्रामस्थांशी बोलून या भागातील नागरिकांचे पुनर्वसन केले जाईल, असे सांगून कदम म्हणाले, ‘‘घर तसेच भांडी व इतर गरजेच्या वस्तू दिल्या जातील. राज्यात जर अशी जी धोकादायक ठिकाणो आहेत त्यांचा सव्र्हे केला जाईल. डोंगर, पठार, अशा सर्व धोकादायक ठिकाणची पाहणी केली जाईल. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर लगेचच पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 

Web Title: Investigations on spurious explosions in Malinas: R. R. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.