मुख्यमंत्र्यांच्या पॅकेजवर तपास सुरू
By Admin | Updated: October 8, 2015 03:04 IST2015-10-08T03:04:38+5:302015-10-08T03:04:38+5:30
केडीएमसी निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीत कल्याण-डोंबिवलीसाठी जे पॅकेज जाहीर केले, त्याबाबत आचारसंहिता भंग होतो की नाही, याचा तपास

मुख्यमंत्र्यांच्या पॅकेजवर तपास सुरू
ठाणे : केडीएमसी निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीत कल्याण-डोंबिवलीसाठी जे पॅकेज जाहीर केले, त्याबाबत आचारसंहिता भंग होतो की नाही, याचा तपास तेथील स्थानिक अधिकारी करीत आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांकडून अहवाल आलेला नाही. काँग्रेसच्या दोन तक्रारी आल्या आहेत. तपासणी करून योग्य कारवाई क रण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.
२७ गावांमधील संघर्ष समिती न्यायालयात गेली आहे, याबाबत ‘अद्याप अंतिम अधिसूचना निघालेली नाही,’ असे त्यांनी स्पष्ट सांगितले. सोशल मीडियाद्वारे आचारसंहितेचे कोणी उल्लंघन करीत असतील
तर कारवाई होईल, असेही
सांगितले.
मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे, जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, तसेच सहमुख्य निवडणूक अधिकारी वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी उपस्थित होते.