हिरानंदानीच्या अन्य रुग्णालयांचीही चौकशी

By Admin | Updated: August 12, 2016 04:29 IST2016-08-12T04:29:21+5:302016-08-12T04:29:21+5:30

हिरानंदानी किडनी रॅकेटप्रकरणात पॅथॉलॉजिस्ट सुविन शेट्टी आणि जनरल सर्जन वीना सेवलीकर यांचा सहभाग असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

Investigation of other hospitals of Hiranandani too | हिरानंदानीच्या अन्य रुग्णालयांचीही चौकशी

हिरानंदानीच्या अन्य रुग्णालयांचीही चौकशी

मुंबई : हिरानंदानी किडनी रॅकेटप्रकरणात पॅथॉलॉजिस्ट सुविन शेट्टी आणि जनरल सर्जन वीना सेवलीकर यांचा सहभाग असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच हिरानंदानी ग्रुपच्या विविध ठिकाणी असलेल्या रुग्णालयांतील कागदपत्रांची पडताळणी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.
हिरानंदानी किडनी रॅकेटच्या राज्यभर पसरलेल्या जाळ्याचा शोध घेण्यास पवई पोलिसांनी सुरुवात केली आहे. याप्रकरणात हिरानंदानी रुग्णालयाच्या सीओईसह ५ डॉक्टरांना अटक होताच त्यांच्याकडे पोलिसांंनी कसून चौकशी सुरू केली आहे. तसेच हिरानंदानी रुग्णालयाशी संलग्न असलेल्या अन्य रुग्णालयांतील कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे.
याप्रकरणात पाहिजे असलेल्या आरोपींमध्ये पॅथॉलॉजिस्ट सुविन शेट्टी आणि जनरल सर्जन वीना सेवलीकर यांचा समावेश उघड झाला आहे. या दोघांचा पोलीस शोध घेत आहे. त्यांचा जबाब नोंदवून त्यांना या गुन्ह्यांत अटक करण्यात येणार असल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Investigation of other hospitals of Hiranandani too