राज्य बँकेच्या माजी संचालकांची चौकशी
By Admin | Updated: April 22, 2015 03:58 IST2015-04-22T03:58:56+5:302015-04-22T03:58:56+5:30
राज्य सहकारी बँकेच्या सर्व माजी संचालकांची सहकार कायद्याच्या कलम ८८ अंतर्गत सुरू असलेली चौकशी येत्या सहा महिन्यांच्या आत पूर्ण

राज्य बँकेच्या माजी संचालकांची चौकशी
मुंबई : राज्य सहकारी बँकेच्या सर्व माजी संचालकांची सहकार कायद्याच्या कलम ८८ अंतर्गत सुरू असलेली चौकशी येत्या सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दले आहेत, अशी माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिली.
पाटील म्हणाले की, नियम ८३ अंतर्गतची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. आता बँकेला झालेल्या नुकसानीसाठीची जबाबदारी कोणाची ही निश्चित करण्यासाठी नियम ८८ ची चौकशी सहकार विभागाकडून सहा महिन्यांच्या आत पूर्ण केली जाईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या बँकेचे संचालक मंडळ तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री यांनी बरखास्त केले होते. संचालकांमध्ये तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होता.
पाटील म्हणाले की नियम ८८ च्या चौकशीत दोषी आढळलेल्या माजी संचालकांपैकी कोणी जूनमध्ये होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत निवडून आले तरी त्यांचे संचालकपद रद्द करण्यात येईल. राज्यातील सर्व सहकारी संस्थांची निवडणूक ३० जूनच्या आत शासनाला घ्यावयाची आहे. भाजपा या निवडणुकीत खासदार, आमदारांसह पूर्ण ताकदीने उतरेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)