महिला अत्याचारविरोधी खाते करणार तपास

By Admin | Updated: July 25, 2014 02:27 IST2014-07-25T02:27:27+5:302014-07-25T02:27:27+5:30

मॉडेलच्या तक्रारीनंतर राज्य पोलीस मुख्यालयात पोलीस उपमहानिरीक्षक हुद्दय़ावर असलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

Investigation against women atrocities | महिला अत्याचारविरोधी खाते करणार तपास

महिला अत्याचारविरोधी खाते करणार तपास

मुंबई : मॉडेलच्या तक्रारीनंतर राज्य पोलीस मुख्यालयात पोलीस उपमहानिरीक्षक हुद्दय़ावर असलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, डीसीपी शारदा राऊत यांच्या नेतृत्वाखालील महिला अत्याचारविरोधी खात्याकडे तपास सोपवला आहे, असे मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी डीसीपी महेश पाटील यांनी सांगितले. 
पोलिसांच्या माहितीनुसार तिने एका महिलेविरुद्ध तक्रार दिली आहे. तिच्या म्हणण्यानुसार ती महिला तिच्यासारखीच दिसते आणि तिने तक्रारकर्तीच्या नावाचा वापर करून एक एस्कॉर्ट सव्र्हिस आणि वेबसाइट सुरू केली होती. त्यानंतर या मॉडेलला अनेक मेसेजेस आल्याने तिने तक्रार दाखल केली. तिने आपल्याला गेल्या चार महिन्यांपासून त्रस दिला जात असल्याची तक्रार दिली असून पारसकर यांच्याविरुद्धही आरोप केले आहेत. तिच्या मते पारसकर अन्य एका मॉडेलच्या प्रभावाखाली वागत आहेत.
पारसकर गुरुवारी नेहमीप्रमाणो कामावर हजर झाले होते. पण त्यांनी दुपारनंतर कार्यालय सोडले. राऊत यांनी गुन्हा जेथे घडला त्या मळवलीतील तीन तारांकित हॉटेलात बुधवारी पंचनामा केल्याचे समजते. तक्रारकर्तीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. पारसकर यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम 376 2 सी (पोलीस असून बलात्कार केल्याबद्दल), 354 आणि 354 (डी) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. 
तपास अधिकारी तपास पूर्ण करेर्पयत पारसकर कामावर येऊ शकतात, असे माजी आयपीएस अधिकारी आणि वकील असलेले वाय. पी. सिंग यांनी सांगितले. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता अशा प्रकरणात आयपीएस अधिका:यांना काही बचाव नाही. मात्र पोलीस आधी आरोपांची खातरजमा करून घेतील आणि पुढील कारवाई करतील. खात्यांतर्गत कारवाईत त्यांना सस्पेंड की डिसमिस करायचे, ते ठरेल.  (प्रतिनिधी) 
 
तिचे टि¦ट्स 
जुलै 21 - मी आहे.. अजून झोपू शकत नाही.. त्या दोघांनाही अटक होईल त्याच दिवशी मी झोपेन. खरे तर 3 किंवा 4 जणांना अटक होईल.
जुलै 2क् - या वरिष्ठ अधिका:याची कार्यालयात भेट घेण्यासाठी अपॉइंटमेंटची वाट बघतेय.
जुलै 19 -  तू मला धमकी देण्याइतक्या खालच्या थराला जाशील, असे वाटले नव्हते. माङयाकडून खंडणी उकळण्यासाठी माणसे पाठवतोस.. माङया कुटुंबाशी कोणी खेळू शकत नाही. 
जुलै 17 - माङया वैयक्तिक आयुष्याची वाट लागली आहे. ठिक आहे. तरीही तुम्हा सर्वाना सुप्रभात.. 
 
पारसकर 1997 बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी 1999मध्ये डीसीपी डिटेन्शन म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते डीसीपी - अँटि नार्कोटिक्स आणि अॅडिशनल कमिशनर (नॉर्थ रिजन) मुंबई म्हणून काम पाहिले आहे. 

 

Web Title: Investigation against women atrocities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.