रेल्वे प्रवाशांना झालेल्या त्रासाची चौकशी करा- आशिष शेलार
By Admin | Updated: June 22, 2016 16:02 IST2016-06-22T16:02:24+5:302016-06-22T16:02:24+5:30
मुंबईत पावसाला सुरुवात होताच गेले काही दिवस रेल्वेची उपनगरीय सेवा विविध कारणास्तव विस्कळीत होत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे

रेल्वे प्रवाशांना झालेल्या त्रासाची चौकशी करा- आशिष शेलार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 – मुंबईत पावसाला सुरुवात होताच गेले काही दिवस रेल्वेची उपनगरीय सेवा विविध कारणास्तव विस्कळीत होत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. याप्रकरणी तात्काळ मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची आज दिल्ली येथे जाऊन भेट घेतली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू एकीकडे प्रवाशांच्या सेवेचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करीत असताना रेल्व्ेा प्रशासनाच्या चुकांमुळे, अधिका-यांच्या दिरंगाईमुळे जर प्रवाशांचे हाल होत असतील तर अशा अधिका-यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली.
रेल्वेने प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. तरीही पावसाला सुरुवात होतानाच हलक्याशा पावसाने गेले दोन दिवस रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते . रेल्वे अधिकारी जरी कामे केली असे सांगत असले तरी प्रत्यक्षात प्रवाशांचेही हाल होत आहेत.