दलित हत्याकांडाचा दोन दिवसांत तपास लावा
By Admin | Updated: October 30, 2014 00:47 IST2014-10-30T00:47:58+5:302014-10-30T00:47:58+5:30
जवखेडे येथील दलित हत्याकांडाची घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून नऊ दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी सापडले नाहीत, हे दुर्दैव आहे.

दलित हत्याकांडाचा दोन दिवसांत तपास लावा
काँग्रेसची मागणी : पीडित कुटुंबाला पक्षाकडून आर्थिक मदत
पाथर्डी (जि. अहमदनगर) : जवखेडे येथील दलित हत्याकांडाची घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून नऊ दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी सापडले नाहीत, हे दुर्दैव आहे. दोन दिवसांत घटनेचा तपास न लागल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिला आहे.
माणिकराव ठाकरे यांनी जवखेडे खालसा येथे बुधवारी भेट देऊन जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केल़े ठाकरे म्हणाले, या घटनेने राज्याची मान खाली गेली आहे. एवढय़ा क्रूरपणो झालेल्या घटनेचा तपास तातडीने लागायला पाहिजे होता. पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा तसेच त्यात कोणीही राजकारण आणू नये. दोन दिवसांत प्रकरणाचा तपास लागला नाही तर राज्यात उद्रेक होईल. त्यातील आंदोलनात काँग्रेस पक्ष सहभागी होईल. ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन काँग्रेस कमिटीतर्फे दोन लाख रुपयांची मदत जाधव कुटुंबीयांना देण्याची घोषणा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अरुण मुगदीया त्यांच्यासोबत होते.
बुधवारी दुपारी माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच घटनास्थळाची पाहणी केली़ विखे म्हणाले, संबंधित घटना राज्य तसेच जिल्ह्याच्या दृष्टीने निंदनीय आहे. पुरोगामी नगर जिल्ह्याला न शोभणारी ही घटना आहे. घटनेचा तपासासाठी पोलीस अधिका:यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
च्अहमदनगर : जवखेडे येथील दलित हत्याकांडाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असताना रोज नवा संदर्भ मिळत असल्याने पोलीस अधिकारी बुचकळ्य़ात पडले आहेत.
च्पोलिसांसमोर रोज एक नवे कथानक येत आहे. त्यामुळे तपासाचा मार्ग बदलावा लागत आहे. दलित नेत्यांची आंदोलने, राजकीय नेत्यांच्या भेटी आणि हत्याकांडाचे प्रकरण थेट राज्यपालांर्पयत गेल्याने पोलिसांवरील दबाव वाढला आहे.
च्जाधव कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याचे 22 ऑक्टोबरला उघडकीस आले होते. जातीयवाद, जमिनीचा वाद की अनैतिक संबंध, यापैकी नेमकी कोणती कारणो हत्येमागे आहेत याचा तपास सुरू आहे. रोज नव्या संशयितांचा शोध आणि त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
च्परिसरातील 7क् ते 8क् संशयितांची चौकशी झाली आहे. पोलिसांची विशेष पथके येथे तळ ठोकून आहेत. तिघांचा आधी गळा आवळून खून करण्यात आला. नंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवाल आणि तपासातून स्पष्ट झाले आहे. मात्र आरोपींना शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
च्सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. रोज संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. अद्याप आरोपीर्पयत पोहोचलेलो नाही. प्रकरणातील क्लिष्टता पाहता तपासाच्या अंतिम टप्प्यावर पोचण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे, असे पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी सांगितले.