लेखापरीक्षण होत नसल्याचा साक्षात्कार!
By Admin | Updated: April 6, 2017 02:07 IST2017-04-06T02:07:56+5:302017-04-06T02:07:56+5:30
महापालिकेच्या कामकाजाचे लेखापरीक्षण होत नसल्याचा साक्षात्कार विरोधी पक्षात गेल्यानंतर भाजपाला झाला
_ns.jpg)
लेखापरीक्षण होत नसल्याचा साक्षात्कार!
मुंबई : महापालिकेच्या कामकाजाचे लेखापरीक्षण होत नसल्याचा साक्षात्कार विरोधी पक्षात गेल्यानंतर भाजपाला झाला आहे. याचे खापर अप्रत्यक्ष शिवसेनेवर फोडून भाजपा नेते नामनिराळे राहिले आहेत. त्यामुळे पारदर्शकतेचे पहारेकरी सत्ताधारी शिवसेनेसाठी डोकेदुखीचे कारण ठरू लागले आहेत.
वैधानिक समित्यांचा लेखाजोखा महापालिका प्रशासनाने दर तीन महिन्यांनी स्थायी समितीमध्ये मांडावा, अशी कायद्यात तरतूद आहे. तरीही कार्यअहवाल सादर
करण्यास प्रशासनाकडून विलंब होत आहे. या संदर्भात पालिकेने निवेदन सादर केले. या निवेदनावर बोलताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला. कधीपासून लेखापरीक्षण कार्यअहवाल प्रलंबित आहे, याची माहिती भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी मागितली. तेव्हा गेल्या २२ वर्षांपासून परीक्षण
कार्यअहवाल सादर न झाल्याचे समोर आले.
आयुक्तांनी तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचा ठराव आहे. या ठरावानुसार २० वर्षे कार्यअहवाल सादर का केला नाही, इतकी वर्षे कार्यअहवाल विचारात न घेता, अर्थसंकल्प सादर कसा काय केला जातो? असे अनेक प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केले.
गेली २१ वर्षे महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता होती. त्यामुळे लेख परीक्षण झाले
नसल्यास सत्ताधारी अडचणीत
येतील. मात्र, हा विषय स्वत: मांडून भाजपाने आपल्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)
।अन्यथा अर्थसंकल्पाला मंजुरी नाही
आॅडिटसाठी टाळाटाळ करून जनतेच्या पैशाचा गैरव्यवहार केला जात आहे.विकासाला खीळ बसली आहे. सत्ताधारी आणि प्रशासन मिळून मुंबईचे नुकसान करत आहेत. कार्यअहवाल सादर न केल्यास अर्थसंकल्प मंजूर होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे रवी राजा यांनी दिला.
।लढा पारदर्शकतेसाठीच...
आमचा लढा हा पारदर्शकतेसाठी असून, आता आम्ही पहारेकरी म्हणून करीत आहोत. लेखा परीक्षण झाले नाही, हा प्रकार गंभीर आहे. जनतेच्या कराच्या रूपाने आलेल्या पैशाचा योग्य हिशेब ठेवलाच पाहिजे. याचा जाब विचारणारच, असा अप्रत्यक्ष इशारा भाजपाचे मनोज कोटक यांनी शिवसेनेला दिला.
तीन महिन्यांत मांडणार लेखाजोखा
पैशाचा विनियोग कसा करणार, १९९२ मध्ये काँग्रेसचा महापौर सोडला, तर गेली २५ वर्षे शिवसेनाच सत्तेवर आहे. त्यामुळे या प्रकाराला शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला. करदात्यांच्या पैशांचा हिशोब ठेवला जात नाही. शिवसेनेचे महापौर मिलिंद वैद्य यांच्या कार्यकाळापासून आॅडिट झालेले नाही.