शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील भाजपच्या यशाचा अन्वयार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 05:14 IST

केंद्राच्या कामगिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचीही जोरकस साथ मिळाली.

- माधव भंडारीकेंद्राच्या कामगिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचीही जोरकस साथ मिळाली. शेती व ग्रामीण भागातील गंभीर समस्या हाताळण्यात देवेंद्रजींनी कौशल्य व समंजसपणाचे दर्शन घडवले त्यास मतदारांनी पसंती दिली. भाजप २०१४ च्या यशाची पुनरावृत्ती अजिबात करू शकणार नाही, असेही बहुतेकांना वाटत होते. हे सर्व अंदाज मतदारांनी साफ खोटे पाडले आणि युतीच्या पदरात यशाचे माप भरभरून टाकले.या निवडणुकीतील भाजपचे यश निर्विवाद आहे. पक्षाने लढवलेल्या २५ पैकी २३ जागा जिंकल्या. त्या २३ मधील चार जागांवर (जळगाव, पुणे, उत्तर मुंबई व रावेर) भाजपला मिळालेल्या मतांचे प्रमाण ६१ टक्क्यांच्या वर आहे. बारा जागांवर भाजपने ५२ टक्क्यांपेक्षा जास्त मते घेतली आहेत. केवळ सात जागांवर भाजपला ५० टक्क्यांपेक्षा कमी मते पडली आहेत. बारामती व चंद्रपूर या दोन्ही पराभूत झालेल्या जागांवरही भाजपला ४० टक्क्यांपेक्षा अधिक मते आहेत. लढवलेल्या २५ जागांवर मिळून भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी ५२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. राज्यात युतीच्या मतांचे प्रमाणही ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. १९५२ नंतर असे निर्विवाद यश आम्हाला पहिल्यांदाच मिळाले. १९७२ च्या निवडणुकीत काँग्रेसने ७० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवली होती. पण त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये विखुरलेला कौल असेच चित्र राज्यात बघायला मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर या यावेळचा कौल समजून घेतला पाहिजे.सर्व घटकांनी - शहरी, ग्रामीण, जाती, धर्म, पंथ, भाषा वगैरे - भाजपवर पसंतीचा शिक्का मारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हा अर्थातच या यशामागचा सर्वात मोठा घटक ! त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेली कामगिरी जनतेला विश्वासार्ह वाटली; त्यांचे नेतृत्व आश्वासक वाटले. भारत जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे असे चित्र या पाच वर्षांत निर्माण झाले. त्यांचे सरकार दहशतवाद व भ्रष्टाचार सहन करत नाही हे स्पष्ट झाले. मोदी सरकारने १३४ लोककल्याणकारी योजना हाती घेतल्या व त्यांचा लाभ कोणताही भेदभाव न करता वंचित, गरीब आणि निम्न मध्यमवर्गातील गरजूंंपर्यंत पोहोचवल्या.केंद्राच्या या कामगिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचीही तेवढीच जोरकस साथ मिळाली. शेती व ग्रामीण भागातील गंभीर समस्या हाताळण्यात मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्रजींनी जे कौशल्य व समंजसपणाचे दर्शन घडवले त्यास मतदारांनी पसंती दिली. जलयुक्त शिवार, शेतकरी यांची कर्जमाफी, पीकविमा, सर्व घरांना वीजपुरवठा, ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री आवास अशा वेगवेगळ्या योजना फडणवीस सरकारने यशस्वीपणे राबवल्या. त्याचा सकारात्मक परिणाम मतदानात दिसला.केंद्र, राज्य सरकारच्या कामगिरीला पक्षसंघटनेची सार्थ साथ मिळाली. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी साडेचार वर्षे अत्यंत बारकाईने नियोजन करून उभारणी केली, सर्व कार्यकर्त्यांना लोकांपर्यंत पोहोचून काम करायला उद्युक्त केले. त्या प्रेरणेतून राज्यभरात अक्षरश: लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. त्यातून सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचत राहिले. शहा यांना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची तोलामोलाची साथ मिळाली. सरकार व संघटना यांच्या या संयुक्त कामगिरीला योग्य पद्धतीने केलेली युती व जोडलेले मित्रपक्ष यांची चांगली जोड मिळाली. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून भाजपला मिळालेले यश महत्त्वाचे आहे.(मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश भाजप)

टॅग्स :BJPभाजपा