International Yoga Day 2018 : ७९ वर्षांचे गृहस्थ शिकवितात योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:34 AM2018-06-21T02:34:51+5:302018-06-21T02:34:51+5:30

अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयातील भारती विद्या भवन येथे गेल्या ६० वर्षांपासून योगाचार्य डॉ. हंसराज यादव हे योगाचे धडे देत आहेत.

International Yoga Day 2018: Yoga in 79-year-old men's teachings | International Yoga Day 2018 : ७९ वर्षांचे गृहस्थ शिकवितात योग

International Yoga Day 2018 : ७९ वर्षांचे गृहस्थ शिकवितात योग

Next

- सागर नेवरेकर 

मुंबई : अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयातील भारती विद्या भवन येथे गेल्या ६० वर्षांपासून योगाचार्य डॉ. हंसराज यादव हे योगाचे धडे देत आहेत. अमेरीकेतून डॉक्टरेड इन सॅक्रेड फिलॉसॉफीचे शिक्षण योगाचार्य यादव यांनी घेतले आहे. त्यांनी आतापर्यंत देशासह विदेशातही योगा शिकवले आहे. यादव यांनी १९५७ साली सांताक्रुझ येथील योग इन्स्टिट्यूटमध्ये योगाचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी योगावर लिखाण केले. त्यांची योगावरील पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. सध्या त्यांचे वय ७९ वर्षे असून, सद्यस्थितीमध्ये ते भवन्स महाविद्यालयात विद्यार्थी, शिक्षक आणि इतरांना योग शिकवतात.
आपल्याला योग करण्याची आवड कशी लागली, याबद्दल अधिक सांगताना डॉ. हंसराज यादव म्हणाले, ‘घरचे सनातनी असल्याने साधू-संतांचे येणे-जाणे होत असे. त्या वेळी साधू-संतांच्या सहवासातून योगाचे धडे मिळू लागले. त्यांच्यासोबत देशभर तीर्थयात्रा केल्या. त्यातून बरेच काही शिकण्यासारखे होते. कालांतराने मुंबईत आल्यानंतर सांताक्रुझ येथील योग इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याचा ‘योग’ आला. तेथे योग शिक्षकाचे प्रशिक्षण घेतले.’
‘मुंबई विद्यीपाठाचे तत्कालीन कुलगुरू टी. के. टोपे यांना पहिल्यांदा योग शिकविण्याचा योग आला होता. इथूनच योग शिकविण्याला सुरुवात झाली. १९५८मध्ये अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयातील भारती विद्या भवन येथे योग शिकवायला सुरुवात केली. बनारस विद्यापीठ, ग्वालियर विद्यापीठ अशा अनेक विद्यापीठांमध्ये जाऊन योगाचे धडे मी दिले आहेत, तसेच युरोप, जपान, अमेरिका, हाँगकाँग इत्यादी देशामध्ये जाऊन तेथील लोकांना योगाचे महत्त्व पटवून दिले आहे. गेल्या पाच वर्षांपासून विदेशात जाणे बंद केले आहे,’ असेही डॉ. हंसराज यादव यांनी सांगितले.
वाचनाची व लिखाणाची आवड असल्याने, ‘ग्लिमसेस आर ग्रेटनेस’ (महानता के दृष्टात:), ‘योगा फॉर स्टुडंट’, ‘योगा कोर्स फॉर आर’, ‘योग से स्वस्थ अन् प्रसन्न मन’, ‘शिक्षा संगीता’ इत्यादी पुस्तकांचे लिखाण केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
>‘योग’ केवळ
हिंदू धर्माचा नाही
योग हे केवळ हिंदू धर्माचा आहे, हा मानव जातीचा एक मोठा गैर समज आहे. जीवन आणि मरण यातील सुख अनुभवायचे असेल, तर योग प्रक्रिया करणे गरजेचे आहे. आसन, क्रिया हे एक योगाचा भाग आहे, अशी माहिती योगाचार्य डॉ. हंसराज यादव यांनी दिली.

Web Title: International Yoga Day 2018: Yoga in 79-year-old men's teachings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yogaयोग