कोयनेत आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव
By Admin | Updated: January 29, 2017 17:01 IST2017-01-29T17:01:59+5:302017-01-29T17:01:59+5:30
रविवारी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रेसिडेन्सी ग्रुपच्या वतीने रविवारी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता

कोयनेत आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव
आॅनलाइन लोकमत
कोयनानगर (सातारा), दि. 29 - जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित झालेल्या सातारा जिल्ह्यातील कोयनानगर येथे रविवारी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रेसिडेन्सी ग्रुपच्या वतीने रविवारी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्या उपस्थितीत हा महोत्सव उत्साहात साजरा झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ हे वर्ष व्हिजिट महाराष्ट्र म्हणून साजरे करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोयनानगर येथे प्रेसिडेन्सी परिवाराने या पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते. पर्यटन महामंडळ या पतंग महोत्सवात सहभागी झाले. अहमदाबाद येथून पतंगबाजी करणारे मान्यवर इको फ्रेन्डली पतंग आणि मांज्या घेऊन या महोत्सवात सहभागी झाले. शंभर फूट उंचावर जाणारे वेगवेगळ्या आकाराचे पतंग हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण होते. यावेळी सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड उपस्थित होत्या.