शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेत पडद्याआड खदखद

By अतुल कुलकर्णी | Updated: June 11, 2019 20:17 IST

महाराष्ट्रात अजूनही आम्हीच मोठे भाऊ आहोत हे भाजपने विसरु नये, अशा शब्दात शिवसेनेच्या जेष्ठ नेत्याने आपली खदखद बोलून दाखवली आहे.

 - अतुल कुलकर्णी मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप सेना युती करताना राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्रीपद निर्माण करायचे आणि ज्याचे सदस्य जास्त त्याने पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यायचे, नंतरची अडीचवर्षे दुस-या पक्षाकडे हे पद जाईल, असे ठरलेले असताना भाजपचे मंत्री विनाकारण वेगवेगळे मुद्दे पुढे करत आहेत, मात्र महाराष्ट्रात  अजूनही आम्हीच मोठे भाऊ आहोत हे भाजपने विसरु नये, अशा शब्दात शिवसेनेच्या जेष्ठ नेत्याने आपली खदखद बोलून दाखवली आहे.भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे जाहीर केल्यानंतर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही तीच री नाशिकला ओढली. त्याआधी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १३५/१३५ जागा दोघांनी लढवायच्या व बाकीच्या जागा मित्रपक्षांना द्यायच्या असा फॉर्म्युला जाहीर केला. त्यावर युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी ट्विट   करत यात भर घातली आहे. ते म्हणतात, ‘‘शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बैठकीत अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. या बैठकीत हजर नसणा-यांनी व्यक्तिगत स्वार्थासाठी युतीतील वातावरण बिघडवू नये.’’ याचे शिवसेनेकडून कोणीही खंडन केलेले नाही. सरदेसाई हे रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचे चिरंजीव आहेत व युवा नेते आदित्य ठाकरेच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यामुळे शिवसेनेने असे टष्ट्वीट करुन त्याची काय प्रतिक्रिया येते हे पाहण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. या सगळ्यात दोन्ही पक्षात पडद्याआड खदखद असल्याचे समोर आले आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला स्पष्ट बहूमत मिळेल याचे नियोजन केल्याचे त्यांचे नजीकचे सांगतात. भाजपला विजय मिळू शकणा-या पण शिवसेनेकडे असलेल्या जागांवर अपक्ष म्हणून किंवा मित्र पक्षाच्या नावाखाली अन्य उमेदवारांना निवडून आणायचे व नंतर त्यांना भाजपमध्ये घ्यायचे, असे नियोजन करणे सुरु झाले आहे. काहीही करुन भाजपने १४५ च्या पुढे एकट्याच्या बळावर जायचे जेणे करून शिवसेना सोबत असल्या नसल्याचा फरकच पडणार नाही, अशी रणनीती आखण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारात शिवसेनेची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाBJPभाजपा