महापौर स्रेहल आंबेकरांच्या उमेदवारीस अंतर्गत विरोध

By Admin | Updated: January 18, 2017 02:53 IST2017-01-18T02:53:52+5:302017-01-18T02:53:52+5:30

मुंबईच्या विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उमेदवारीस शिवसेनेतूनच विरोध होत आहे

Internal opposition to Mayor Sehal Ambekar's candidature | महापौर स्रेहल आंबेकरांच्या उमेदवारीस अंतर्गत विरोध

महापौर स्रेहल आंबेकरांच्या उमेदवारीस अंतर्गत विरोध


मुंबई : मुंबईच्या विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उमेदवारीस शिवसेनेतूनच विरोध होत आहे. स्नेहल आंबेकर प्रभाग क्रमांक १९८ मधून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात असून त्यास स्थानिक शिवसैनिकांनी विरोध दर्शविला आहे. तसेच बुधवारी शिवसेना खासदार अनिल देसाई यांना याबाबत निवेदन देणार आहेत.
यंदा पालिका निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना करण्यात आल्याने अनेक विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग विभागले गेले असून काही जणांचे तर शेजारील प्रभागात विलीन करण्यात आले. स्नेहल आंबेकर यांचा लोअर परळ या १९८ क्रमांकाच्या प्रभागाचे विभाजन करून तो शेजारील दोन प्रभागांमध्ये विलीन झाला. त्यामुळे त्या शेजारील १९१ मधून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यास शिवसेनेच्याच नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या समर्थकांनी विरोध दर्शविला आहे. आंबेकर यांची उमेदवारी लादू नये, म्हणून शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि महिला आघाडीचे कार्यकर्ते बुधवारी अनिल देसाई यांची भेट घेणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Internal opposition to Mayor Sehal Ambekar's candidature