शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची खात्यांतर्गत परीक्षा ऑक्टोबरमध्ये?, महासंचालकांचे आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 05:44 IST

police : महासंचालकांनी खात्यांतर्गत २५ टक्के पोलीस उपनिरीक्षकांची भरती ही परीक्षेतून होणार असून २०२४ पर्यंत ती चालणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

- शिवराज बिचेवारनांदेड : २०१८ पासून पोलीस दलात खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षकांच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यात ही परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ही परीक्षा तूर्त रद्द होणार नसल्याचे सांगितले होते. त्यात आता ७६५ पदांसाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात परीक्षा घेण्यासंदर्भात पत्र त्यांनी लोकसेवा आयोगाला पाठविले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

पोलीस दलात वेळेवर प्रमोशन मिळत नाही. त्यामुळे अनेक वर्षे कर्मचारी त्याच जागेवर राहतो. सेवानिवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षकापर्यंतही पोहोचत नाही. त्यामुळे यात बदल करण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. महासंचालक पांडे यांनी त्यासाठी १०-२०-३० असा प्रस्ताव पाठविला आहे. या निर्णयामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रमोशनची संधी मिळणार आहे. 

महासंचालकांनी खात्यांतर्गत २५ टक्के पोलीस उपनिरीक्षकांची भरती ही परीक्षेतून होणार असून २०२४ पर्यंत ती चालणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्येकाला तीन संधी देण्यात येणार आहे, परंतु नव्याने भरती होणाऱ्यांना ही संधी मिळणार नाही असेही स्पष्ट केले होते. खात्यांतर्गत सरळसेवा मर्यादित पोलीस उपनिरीक्षकांच्या मंजूर २ हजार ४६५ पदांपैकी सेवाज्येष्ठता यादीनुसार १ हजार ९१७ प्रत्यक्ष कार्यरत आहेत.

पोलिसांना शिवशाहीचा प्रवास मोफत मिळणार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना वॉरंट दिला जातो. या वॉरंटवर ते बस आणि रेल्वेमध्ये प्रवास करतात. परंतु, त्यांना आजपर्यंत शिवशाहीमध्ये प्रवास करण्याची मुभा नव्हती. मात्र पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या कर्मचाऱ्यांना शिवशाहीमध्ये प्रवास करण्याची सवलत द्यावी, असे पत्र एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांना पाठविले आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

टॅग्स :Policeपोलिस