घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळी पुण्यात जेरबंद
By Admin | Updated: June 5, 2017 17:06 IST2017-06-05T16:43:59+5:302017-06-05T17:06:48+5:30
सोनसाखळी, घरफोडी, वाहनचोरी यांसह सोन्या-चांदीचे दागिने इत्यांदींची चोरी करणा-या आंतरराज्य टोळीच्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट 5 ने जेरबंद केले.

घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळी पुण्यात जेरबंद
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 5 - सोनसाखळी, घरफोडी, वाहनचोरी यांसह सोन्या-चांदीचे दागिने इत्यांदींची चोरी करणा-या आंतरराज्य टोळीच्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट 5 ने जेरबंद केले. त्यांच्याकडून 3 लाख 8 हजार 482 रुपयांचे परकीय चलन( पौंड, डॉलर), 59 लाख 76 हजार 75 रुपयांचे सोन्याचे दागिने, दुचाकी यांसह बायनाक्युलॅर लावलेली छ-याची बंदूक, 1800 वॅटचे कटर मशीन, मोबाईल आणि चारचाकी, दुचाक्या गाड्या जप्त करण्यात आल्या.
जफर शाहजमान इराणी ( वय 38 रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर ता. हवेली, सध्या शिंदे मळा, कंजारी वस्ती ,दौंड) आणि एकूण 12 गुन्हे तर अमजद पठाण ( वय 35, मूळ रा, कसबा खटोली तहसील जानसट मुझ्झफर नगर, उत्तरप्रदेश, सध्या टी. पी एस रोड शिवाजीनगर), एकूण 5 गुन्हे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत
पुणे शहरात या टोळीकडून गेल्या तीन ते चार वर्षांत 51 गुन्हे उघडकीस आले असून, अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 सुरेश भोसले, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 चे संजय निकम उपस्थित होते.