शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्य दरोडेखोर उत्तम बारडचा ताबा वैभववाडी पोलिसांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 20:04 IST

आंतरराज्य दरोडेखोर उत्तम राजाराम बारड (25, रा. धामोड, ता. राधानगरी) याला वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वैभववाडी : आंतरराज्य दरोडेखोर उत्तम राजाराम बारड (25, रा. धामोड, ता. राधानगरी) याला वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर एलसीबीने अटक करण्यापूर्वी तो दोन महिने कोकिसरेत वास्तव्यास असताना तालुक्यात घरफोडीचे सत्र सुरू होते. त्यामुळेच वैभववाडी पोलिसांनी त्याचा ताबा घेतला असून, त्या चो-यांचा छडा लागतो का ? हे पाहावे लागणार आहे.उत्तम बारड हा कंपनीचा एजंट म्हणून कोकिसरे फाटकानजीक दोन महिने पत्नीसह भाड्याने राहत होता. त्या कालावधीत २६ जानेवारी २०१७ च्या रात्री बेळेकरवाडी येथे राहणारे श्रीराम शिंगरे यांचे घर अज्ञाताने फोडले होते. त्यानंतर महिनाभरातच टीव्ही, फ्रिजचे शोरुम फोडून चोरट्याने एलसीडी लंपास केला होता. त्याच रात्री कासार्डे तिठ्यावरील कापड दुकानही फोडण्यात आले होते.कोल्हापूर एलसीबीने बारडला कोकिसरेतून रातोरात उचलून नेला होता. त्यावेळी त्याने कासार्डेतील चोरीची कबुली दिली मात्र, त्याच रात्री झालेल्या वैभववाडीतील चो-यांबाबत त्याने अद्याप तोंड उघडलेले नाही. त्यामुळे शोरुममधील एलसीडी चोरीच्या तपासासाठी सोमवारी कणकवली पोलिसांकडून वैभववाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. उत्तम बारड याच्यावर महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यात दरोड्यांचे असंख्य गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील चो-या, घरफोड्या त्याच्याकडून कबूल करून घेताना पोलिसांचे कसब पणास लागणार आहे. पोलीस हवालदार राजू जामसंडेकर त्या चोरीचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Arrestअटकsindhudurgसिंधुदुर्ग