शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ई-पीक नाेंदणी केली तरच मिळेल विमा दावा; विमा कंपन्यांच्या मनमानीलाही बसणार चाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 07:46 IST

राज्य सरकारने याबाबत १ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामात प्रथमच अशा पद्धतीचे बंधन घालण्यात आले आहे

 नितीन चौधरी

पुणे : शेतकऱ्यांच्या विमा दाव्यांना नाकारणाऱ्या विमा कंपन्यांच्या मनमानीला चाप बसावा तसेच बोगस शेतकऱ्यांकडून दाखल होणाऱ्या विमा दाव्यांना आळा बसावा, या हेतूने राज्य सरकारने आता पीक विमा घेण्यासाठी त्या पिकांची ई-पीक पाहणीअंतर्गत नोंदणी बंधनकारक केली आहे, त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला ही नोंदणी असल्याशिवाय दावा करता येणार नाही.

राज्य सरकारने याबाबत १ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामात प्रथमच अशा पद्धतीचे बंधन घालण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ यामुळे पिकांच्या नुकसानभरपाईसाठी पीकविमा उतरवला जातो. नुकसानीचे निकष ठरविताना जिल्हा, तालुका, मंडळ व ग्रामस्तरावर पीक कापणी उत्पादन अहवाल महत्त्वाचा ठरतो. त्यावरच नुकसानीची टक्केवारी किती आहे, हे कळते. विमा कंपन्या या अहवालानुसार तसेच शेतकऱ्यांच्या पिकाची सातबारा उतारावरील नोंद, पिकाचे झालेले नुकसान यावरून विमा दावे निकाली काढतात.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विमा कंपन्यांनी दावे नाकारण्यावरून राज्य सरकारमध्ये सहभागी असतानाही शिवसेनेने विमा कंपन्यांवर हल्ले केले होते. त्यानंतर विमा कंपन्यांनी माघार घेत अनेक शेतकऱ्यांना विमा दावा दिला होता. मात्र, यात कंपन्यांचीही लबाडी उघड झाली होती. नोंदणी असतानाही कंपन्यांनी दावा नाकारल्याची अनेक प्रकरणे न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.

नाेंदणीचा दुहेरी फायदाया अडचणीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने आता पीकविमा काढताना त्या पिकाची नोंदणी ई-पीक पाहणी ॲपवरूनच करावी, असे निर्देश दिले आहेत. ही नोंदणी बंधनकारक आहे. याचा फायदा राज्य सरकारला पिकाखालील क्षेत्र किती आहे, किती शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे, संभाव्य उत्पादन किती असेल, याचा अंदाज घेण्यासाठी होणार आहे. ई-पीक नाेंदणीमुळे शेतकऱ्यांना आपण नोंदणी केलेल्या पिकाचा विमा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्याच्या पिकाची नोंदणी थेट शासकीय यंत्रणेकडेच उपलब्ध होणार असल्याने विमा कंपनीला दावा नाकारता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळण्यास मदत होईल. 

शेतकऱ्यांना पिकाची नोंदणी ई-पीक पाहणी ॲपवर करता यावी, यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर खरीप पिकासाठी नोंदणी करता येणार नाही. याचा फायदा पीकविमा दाव्यांमध्ये होईल. - बालाजी शेवाळे, राज्य उपसमन्वयक, ई-पीक पाहणी