शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एकेक फोडण्यापेक्षा निवडणुका घेऊन दाखवाच; उद्धव ठाकरे यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 12:40 IST

"एकदाच काय त्या निवडणुका होऊन जाऊ दे... एकेक  फोडण्यापेक्षा निवडणुका घेऊन दाखवा."

मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  ठाकरे गटातील माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करत असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावर शनिवारी भाष्य केले. एकदाच काय त्या निवडणुका होऊन जाऊ दे... एकेक  फोडण्यापेक्षा निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले.

सायन, ॲटॉप हिल येथील माजी नगरसेवक मंगेश सातमकर, तृष्णा विश्वासराव यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी शनिवारी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कुणीतरी पक्षाला सोडून गेल्यानंतर आपल्या सागराला जास्त उधाण येते,  मग ते उधाण रागाचे, त्वेषाचे,  जिद्दीचे आहे… आपली जिंकण्याची ईर्ष्याही आणखी वाढत आहे, अशा शब्दांत कार्यकर्त्यांचे कौतुक करत जे लोक आपला पक्ष सोडून गेले आहेत त्यांना ‘जय महाराष्ट्र’. ज्यांना जायचे आहे, त्यांना जाऊ द्या. आता एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी आता पक्षाशी गद्दारी करू नये. पक्षविरोधी काम करू नये. अन्यथा आपल्याला शिवसैनिक म्हणून याकडे बघावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

- पाच वर्षांनंतर एनडीए नावाचा अमिबा जिवंत आहे हे त्यांना आता कळले. कारण अमिबामध्ये एक पेशीच असते.  तो वाकडातिकडा कसाही असतो, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर निशाणा साधला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना