पोलीस तटबंदीत आंदोलनाची घुसमट!

By Admin | Updated: March 20, 2015 01:21 IST2015-03-20T01:21:58+5:302015-03-20T01:21:58+5:30

जैतापूर प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसह जोरदार घोषणा देत गुुरुवारी कुवारबांव येथे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील मोर्चाने प्रकल्पाविरोधात हल्लाबोल केला.

Inspector of the police wall protests! | पोलीस तटबंदीत आंदोलनाची घुसमट!

पोलीस तटबंदीत आंदोलनाची घुसमट!

रत्नागिरी : जैतापूर प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसह जोरदार घोषणा देत गुुरुवारी कुवारबांव येथे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील मोर्चाने प्रकल्पाविरोधात हल्लाबोल केला. शिष्टमंडळाला प्रकल्पाच्या रत्नागिरी कार्यालयात जाऊही न दिल्यामुळे ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांसह ६१२ आंदोलकांची धरपकड करण्यात आली. त्यांच्यावर कलम ६८ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करून कलम ६९ अन्वये सोडून देण्यात आले. मात्र, पोलिसांच्या तटबंदीत या आंदोलनाची पुरती घुसमट झाली. आंदोलकांच्या संख्येच्या दुप्पट पोलीस, अशी स्थिती दिसत होती.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी आंदोलनाची जोरदार तयारी केली होती. या आंदोलनात गनिमीकावा वापरला जाणार असल्याचीही चर्चा होती. चार वर्षांपूर्वी जैतापूूर आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे गुरुवारचे कुवारबांवचे आंदोलन शांततेत व्हावे, कायदा व सुव्यवस्था स्थिती बिघडू नये, म्हणून पोलीस व जिल्हा प्रशासनाने कुवारबांव परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कुवारबांव ते आरटीओ चौक या १ किलोमीटर रस्त्यावर रिकामी डांबर पिंंपे व बांबू यांचा दुभाजक बनविण्यात आला होता. एका बाजूने मोर्चेकऱ्यांना मार्ग मोकळा ठेवण्यात आला होता. दुसऱ्या बाजूने दुहेरी वाहतूक सुरू होती.
सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आंदोलक कुवारबांव येथील डॉ. आंबेडकर भवनाबाहेर रस्त्यावर गोळा होऊ लागले. ११.४५ वाजता आंदोलक मोर्चाद्वारे रस्त्याने चालत अणुऊर्जा प्रकल्पाच्या कार्यालयाकडे निघाले. त्यांना पोलिसांनी कुुवारबांवमध्येच अडविले. तेथेच १२.१५ वाजता मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे खासदार विनायक राऊत, सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, मच्छीमार नेते अमजद बोरकर आदी उपस्थित होते. त्यांनी सभेत प्रकल्पाच्या हद्दपारीबाबत जोरदार भाषणे केली. अणुऊर्जा प्रकल्प कार्यालयात जाण्यावरून शासकीय अधिकारी व शिवसेना नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांनी नेत्यांसह आंदोलकांना पकडून औद्योगिक वसाहतीतील अन्न महामंडळाच्या वखारीत नेण्यात आले. तेथे त्यांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Inspector of the police wall protests!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.