केंद्रप्रमुखांच्या प्रश्नांबाबत आग्रही : विजय शिवतारे
By Admin | Updated: September 20, 2016 01:55 IST2016-09-20T01:55:50+5:302016-09-20T01:55:50+5:30
अभावित केंद्रप्रमुखांना कायम करण्याचा निर्णय मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांची बैठक घेऊन लवकरच घेतला जाईल.

केंद्रप्रमुखांच्या प्रश्नांबाबत आग्रही : विजय शिवतारे
गराडे : अभावित केंद्रप्रमुखांना कायम करण्याचा निर्णय मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांची बैठक घेऊन लवकरच घेतला जाईल. केंद्रप्रमुखांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मार्ग काढला जाईल, अशी खात्री जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
वानवडी (ता. पुरंदर) येथे महात्मा फुले सांस्कृतिक भवनात महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख असोसिएशन व पुणे जिल्हा केंद्रप्रमुख असोसिएशन यांच्या वतीने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, बाळा भेगडे, संजय माने, रामराव जगदाळे, राजेंद्र जगताप, डॉ. मुश्ताक शेख, मीना शेंडकर, बाळासाहेब मारणे, वि. म. शिंदे, आप्पासाहेब कुल, एन. वाय. पाटील, सुखदेव सोनवणे, मंगेश मोरे, शंभू पवार, सुरेश मोरे, प्रदीप कुंजीर, राजेंद्र कुंजीर, तानाजी फडतरे, सुनील कांबळे ,संदीप कदम, संजय पापळ, निळकंठ घायतडक, बाळासाहेब फडतरे आदी उपस्थित होते.
पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे- गुणवंत गटशिक्षणाधिकारी- ज्योती परिहार . गुणवंत विस्तार अधिकारी- सदाशिव चव्हाण . सचिन लोखंडे . शिक्षकमित्र- मंगेशराव मोरे , शंभू पवार. राज्यस्तरीय गुणवंत केंद्रप्रमुख- प्रताप मेमाणे , गजाजन परदेशी . जिल्हास्तरीय गुणवंत केंद्रप्रमुख : विजय जंगले व शैला फल्ले , प्रकाश शिंदे व आशा पवार , रामचंद्र कुमकर व स्मिता धाराशीवकर , शब्बीर शेख व अनुपमा माने , अशोक ससाणे व निर्मला धुमाळ , दीपक नलावडे व लक्ष्मण शिळीमकर , शेषराव राठोड व सुनीता कदम , दुंदा भालिंगे व रंजना डुंबरे (जुन्नर), जिजाभाऊ मिंडे व अंजली मेदनकर (खेड).(वार्ताहर)