शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सोमय्यांची तीन तास चौकशी; आय.एन.एस. विक्रांत युद्धनौका निधी घोटाळा प्रकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 08:45 IST

आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा नील यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

मुंबई :  आय.एन.एस. विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून अपहार केल्याच्या आरोपप्रकरणी सोमवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावली. तीन तासांच्या चौकशीअंती त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. चौकशीनंतर बाहेर पडताच, सोमय्या यांनी, मी तपासाला पूर्ण सहकार्य केले आहे. तसेच माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. सत्याचाच विजय होईल, असे सांगितले.आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा नील यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.  माजी सैनिक बबन भोसले यांनी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  दाखल गुह्यांतील रक्कम १० कोटींपेक्षा जास्त असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी दोघांनाही समन्स बजावत चौकशीला बोलावले होते. मात्र दोघेही चौकशीला हजर राहिले नाहीत. यावेळी त्यांच्या वकिलाने ५ पानांचा जबाब आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता.  त्यात विक्रांत वाचवण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमांच्या सर्व माहितीसह राष्ट्रपती व राज्यपाल यांच्याशी केलेले पत्रव्यवहार, त्याबाबत करण्यात आलेले ट्वीटदेखील सादर करण्यात आले. त्यावेळची छायाचित्रे व निवेदनेही दाखवण्यात आली. त्या छायाचित्रात संजय राऊत स्वत: असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले होते.   त्यापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्यांना अटकेपासून संरक्षण देत, अटक झाल्यास ५० हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देश दिल्यानंतर,  सोमय्या हे सोमवारी सकाळी ११ वाजता आर्थिक गुन्हे शाखेत हजर झाले. यावेळी त्यांच्याकडील काही कागदपत्रेही त्यांनी तपास अधिकाऱ्यांना दिली आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीच्याआधारे आर्थिक  गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. तसेच गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येऊ शकते, असेही अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपा