शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

आयएनएस वेला नौदलात दाखल; पश्चिम विभागात कार्यरत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 13:08 IST

फ्रान्सच्या सहकार्याने माझगाव डॉकमध्ये स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुड्यांची बांधणी सुरू आहे. यापूर्वी आयएनएस कलवरी, खंदेरी आणि करंज या तीन पाणबुड्या नौदलात दाखल करण्यात आल्या होत्या.

मुंबई: हेरगिरीसाठीची अत्याधुनिक यंत्रणा, लांबपल्ल्याचे पाणतीर आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज अशी पाणबुडी आयएनएस वेला गुरुवारी नौदलात समाविष्ट करण्यात आली. मुंबईतील नौदल गोदीत नौदलप्रमुख ॲडमिरल करमबीर सिंग यांच्या हस्ते ही पाणबुडी औपचारिकपणे नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. नौदलाच्या पश्चिम विभागाच्या ताफ्यात ही पाणबुडी कार्यरत असेल.फ्रान्सच्या सहकार्याने माझगाव डॉकमध्ये स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुड्यांची बांधणी सुरू आहे. यापूर्वी आयएनएस कलवरी, खंदेरी आणि करंज या तीन पाणबुड्या नौदलात दाखल करण्यात आल्या होत्या. आज या श्रेणीतील चौथी पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात आली आहे. नौदल गोदीतील या सोहळ्यास नौदलप्रमुख करमबीर सिंग यांच्यासग खासदार अरविंद सावंत, पश्चिम विभागाचे प्रमुख व्हॉइस ॲडमिरल आर. हरी कुमार, एमडीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्हॉइस अडमिरल (निवृत्त) नारायण प्रसाद यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याआधीच्या वेला या रशियन बनावटीच्या फॉक्सट्रॉट श्रेणीच्या आणि २००९ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या पाणबुडीचा कर्मचारीवर्ग सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होता. अकरा महिन्यांच्या कठोर सागरी परीक्षणानंतर आयएनएस वेला नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या पाणबुडीमुळे नौदलाची क्षमता निश्चितच वाढली असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

अशी आहे आयएनएस वेला -या पाणबुडीची लांबी साधारण ६७.५ मीटर तर उंची १२.३ मीटर इतकी आहे. समुद्रात तीनशे ते चारशे मीटर खोलपर्यंत डुबकी लावण्यास ही पाणबुडी सक्षम आहे. तर यात बसविलेल्या यंत्रांचा आवाज कमीत कमी असल्याने समुद्रात फारसा आवाज न करता दबा धरून शत्रूला टिपण्याची शक्ती या पाणबुडीत आहे. दहा अधिकारी आणि २५ नौसैनिक या पाणबुडीवर तैनात असतील तर तब्बल ४५ दिवस खोल समुद्रात मोहीम राबविण्याची या पाणबुडीची क्षमता आहे. अत्याधुनिक सोनार प्रणालीमुळे समुद्रातील छोट्या हालचाली टिपण्यास ही पाणबुडी सक्षम आहे. लांबपल्ल्याची पाणसुरुंग, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक सोनार आणि सेन्सर संच, प्रगत शस्त्रास्त्रे, रडार, सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टमने सुसज्ज असलेली ही पाणबुडी नौदलाची शक्ती वाढविणारी आहे.

वेला नावाचा इतिहासभारतीय नौदलात १९७३ ते २००९ दरम्यान कार्यरत रशियन बनावटीची आयएनएस वेला ही पाणबुडी कार्यरत होती. वेला श्रेणीतील ही प्रमुख पाणबुडी होती. हेच नाव आणि निशाण नव्या पाणबुडीच्या माध्यमातून कायम ठेवण्यात आले आहे. भारतीय समुद्रात आढळणाऱ्या स्टिंग रे प्रजातीच्या माशावरून या पाणबुडीला वेला हे नाव देण्यात आले आहे. मराठी मच्छीमारांमध्ये पाकट या नावाने ओळखला जाणारा हा मासा आक्रमक असतो. या माशाच्या शेपटीचा दंश अत्यंत घातक मानला जातो. शिवाय, शत्रूपासून बचावासाठी समुद्री वातावरणानुसार रंगरूप बदलण्याची विशेष क्षमता या माशात आहे. या सर्व वैशिष्ट्यांवरूनच या पाणबुडीला वेला हे नाव देण्यात आले आहे. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलMumbaiमुंबईSoldierसैनिक