आयएनएस गंगामध्ये स्फोट

By Admin | Updated: May 9, 2014 22:34 IST2014-05-09T21:13:29+5:302014-05-09T22:34:01+5:30

नौदलाच्या आयएनएस गंगा बोटीत स्फोट होऊन आग लागल्याची घटना सकाळी घडली.

INS Gangetic blast | आयएनएस गंगामध्ये स्फोट

आयएनएस गंगामध्ये स्फोट

आयएनएस गंगामध्ये स्फोट, वेल्डिंगचे काम करतानाची घटना
चार जण जखमी
मुंबई - नौदलाच्या आयएनएस गंगा बोटीत स्फोट होऊन आग लागल्याची घटना सकाळी घडली. या घटनेत चार जण जखमी झाले. वेल्डिंगचे काम करताना गॅसचा स्फोट होऊन ही आग लागल्याचे सांगण्यात आले. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आयएनएस मातंगा बोटीला आग लागली होती.
आयएनएस सिंधुरत्न, आयएनएस सिंधुरक्षक, आयएनएस कोलकोत्ताला ,आयएनएस मातंगाला झालेल्या अपघातानंतर नौदलांच्या बोटींचे अपघातसत्र सुरुच आहे. शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आयएनएस गंगा या बोटीच्या बॉयलर रुममध्ये स्फोट होऊन आग लागली. ही बोट डॉकयार्ड येथील नौदल गोदीत दुरुस्तीच्या कामासाठी आली आहे. बॉयलर रुममध्ये वेल्डिंगचे काम केले जात होते. तत्पूर्वी या कामासाठी गॅसचा वापर केला जातो. मात्र त्याचेच काम सुरु असताना गॅसचा साठा वाढत गेला आणि त्याचा छोटा स्फोट झाला. हा स्फोट होताच एक मोठा आवाज होऊन प्रकाश झाला. त्याचवेळी या रुममध्ये कामानिमित्त असलेले असलेले दोन खलाशी आणि दोन डॉकयार्डमधील कर्मचारी यांच्या डोळ्यांना त्रास झाला. त्यांना तात्काळ नौदलाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आयएनएस गंगा ही गस्त घालणारी बोट असून त्यावर अनेक सामुग्रीही आहेत.



आयएनएस मातंगा बोट एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात दुरुस्तीच्या कामासाठी नौदल गोदीत उभी होती आणि दुपारी तीनच्या सुमारास या बोटीवर खासगी कंपनीकडून स्टील वेल्डिंगचे काम केले जात होते. हे काम सुरु असताना त्याचवेळी छोटीशी आग या बोटीवर लागली होती.

Web Title: INS Gangetic blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.