संजय दत्तच्या रजेची चौकशी होणार - गृह राज्यमंत्री
By Admin | Updated: December 26, 2014 17:23 IST2014-12-26T15:42:19+5:302014-12-26T17:23:55+5:30
१९९३ च्या बाँबस्फोटात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगणा-या अभिनेता संजय दत्तला मिळणा-या रजेची आता चौकशी होणार आहे.

संजय दत्तच्या रजेची चौकशी होणार - गृह राज्यमंत्री
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - १९९३ च्या बाँबस्फोटात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगणा-या अभिनेता संजय दत्तला मिळणा-या रजेची आता चौकशी होणार आहे. गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी ही घोषणा केली असून यामुळे संजूबाबाच्या सुट्टीवर लगाम बसण्याची चिन्हे आहेत.
अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकऱणी अभिनेता संजय दत्तला पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. निकाल लागण्यापूर्वीच संजय दत्त दीड वर्ष तुरुंगात होता. त्यामुळे आता त्याला साडे तीन वर्ष तुरुंगात राहावे लागणार होते. यानुसार मे २०१३ पासून संजय दत्त पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मात्र गेल्या दीड वर्षात संजय दत्त तब्बल चार महिने संचित आणि अभिवाचन रजेवर तुरुंगातून बाहेर आला आहे. संजय दत्तला वारंवार मिळणा-या रजेसंदर्भात सर्वत्र टीका होत असल्याने राज्याचे गृह विभागाने संजूबाबाला मिळणा-या रजेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.