आरोग्य विभागाने नेमली चौकशी समिती
By Admin | Updated: April 7, 2016 17:53 IST2016-04-07T17:21:56+5:302016-04-07T17:53:20+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मनमानी खरेदीसंदर्भातल्या बातम्या लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने दखल घेत चौकशी समिती नेमली आहे

आरोग्य विभागाने नेमली चौकशी समिती
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मनमानी खरेदीसंदर्भातल्या बातम्या लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने दखल घेत चौकशी समिती नेमली आहे. आरोग्य मंत्री डॉ. दीपक सांवत यांनी श्रीमती कुंदन यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही विधानसभेत गुरुवारी दिली.
नियम आणि निकष डावलून सार्वजनिक आरोग्य विभागाने कोट्यवधी रुपयांच्या औषधांची मनमानीपणे खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, यापैकी महागडी औषधे वापराविना वाया गेली असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
याखेरीज व्हेन्टिलेटर्सच्या खरेदीतही लाखो रुपये वाया जात असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात लोकमतने बुधवारी व गुरुवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याचे पडसाद विधानसभेत उमटले आहेत.