प्राध्यापक छळ प्रकरणाची चौकशी करा
By Admin | Updated: May 3, 2015 05:02 IST2015-05-03T05:02:59+5:302015-05-03T05:02:59+5:30
सिटिझन फोरमचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील गैरप्रकार उघडकीस आणणारे पदाधिकारी प्राध्यापक वैभव नरवडे यांच्यावर

प्राध्यापक छळ प्रकरणाची चौकशी करा
मुंबई : सिटिझन फोरमचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील गैरप्रकार उघडकीस आणणारे पदाधिकारी प्राध्यापक
वैभव नरवडे यांच्यावर धारावी आणि वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांकडून दाबाव टाकण्यात येत आहे. पोलिसांनी नरवडे यांचा छळ सुरू केल्याचे
सांगत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील काही महाविद्यालयांतील गैरप्रकार उघकीस आल्यानंतर सिटिझन
फोरमने संबंधित महाविद्यालयांवरील कारवाईसाठी तंत्रशिक्षण संचालनालय, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
फोरमच्या तक्रारींची दखल घेत तंत्रशिक्षण परिषदेने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील महाविद्यालयांची चौकशी केली. यामध्ये अपात्र ठरलेल्या महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या प्रकारानंतर काही संस्थांनी धारावी आणि वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात नरवडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
नरवडे यांनी पोलीस सहआयुक्त धनंजय कमलाकर यांची भेट
घेतली होती. त्यानुसार कमलाकर
यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून नरवडे यांच्यावरील खोटे
गुन्हे काढून टाकण्याचे आदेश
दिले होते. यानंतरही पोलिसांकडून नरवडे यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. (प्रतिनिधी)