फर्ग्युसनमधील घटनेची चौकशी करा

By Admin | Updated: March 29, 2016 01:35 IST2016-03-29T01:35:00+5:302016-03-29T01:35:00+5:30

पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयात देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोप ठेवून पुरोगामी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची शिफारस प्राचार्यांनी का केली, याबाबत चौकशी करून

Inquire about the incident in Ferguson | फर्ग्युसनमधील घटनेची चौकशी करा

फर्ग्युसनमधील घटनेची चौकशी करा

मुंबई : पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयात देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोप ठेवून पुरोगामी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची शिफारस प्राचार्यांनी का केली, याबाबत चौकशी करून
निवेदन सादर करावे, असे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी सरकारला दिले.
फर्ग्यूसन महाविद्यालयात देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोप ठेवून आंबेडकरी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाते.
हा प्रकार गंभीर असून
सरकार विरोधकांचा आवाज
दाबत असल्याचा आरोप लोकभारतीचे कपिल पाटील यांनी स्थगन प्रस्तवाच्या माध्यमातून विधान परिषदेत केला.
काँग्रेसचे अनंत गाडगीळ, राष्ट्रवादीचे जयदेव गायकवाड, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शरद रणपीसे, भाई जगताप यांनी प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, राज्यात सर्वत्र शांतताच आहे. तरीही कुणीही बोलावले नसताना फर्ग्यूसनमध्ये जाऊन उगाचच एखाद्या आमदार जर वातावरण विघडविण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते योग्य नाही. हे करत असताना वंदेमातरम, भारतमाता की जय बोलणार नाही, अशा प्रकारची भूमिका कुणी घेणार असेल तर सरकार ते कदापी सहन करणार नाही, असेही खडसे म्हणाले.

आंदोलन दडपण्याचा होतोय प्रयत्न
रोहित वेमुला आणि जेएनयू प्रकरणानंतर देशभरात आंदोलन दडपण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. फर्ग्यूसनमधील प्रकार त्याचाच एक भाग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू सुजत आंबेडकर यांच्यावर देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोप केला जात आहे. देशभक्त कोण आणि देशद्रोही कोण? यावरच आता चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी कपिल पाटील यांनी केली.

जय भीमची घोषणा देशद्रोही कशी
परवानगी न घेता अभाविपने कार्यक्रम आयोजित केला. त्याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या आंबेडकरी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी ‘इस देशमे रहना होगा, जयभीम कहना होगा’, अशी घोषणाबाजी केली. जयभीम बोलणे देशद्रोह आहे का? असे असेल तर मी ही घोषणा देतोे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

Web Title: Inquire about the incident in Ferguson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.