शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांमध्ये डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 20:13 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला पक्क्या शाईने निशाणी केली जाते; तसेच पुनर्मतदानाच्यावेळी डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या स्थायी सूचना आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 24 मार्च 2019 रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला पक्क्या शाईने निशाणी केली जाते; तसेच पुनर्मतदानाच्यावेळी डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या स्थायी सूचना आहेत. मात्र भारत निवडणूक आयोगाने 10 मार्च 2019 रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यात 11, 18, 23 ते 29 एप्रिल 2019 अशा चार टप्प्यांत मतदान होणार आहे. लोकसभा आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी साधारणत: एकाच वेळी मतदान होत असल्याने शाईच्या निशाणीबाबत संभ्रम निर्माण होऊ नये, याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाई न लावता इतर कोणत्याही बोटावर शाई लावावी, असे निर्देश देण्याची विनंती महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली होती.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने 24 मार्च 2019 रोजी होणाऱ्या 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, 82 सरपंचांच्या रिक्तपदाच्या पोटनिवडणुका, विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील 4 रिक्तपदांच्या पोटनिवडणुका आणि 3 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील एकूण जागा व मतदारांची संख्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा अत्यंत कमी असल्यामुळे हा बदल केल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही, असे सहारिया यांनी स्पष्ट केले.

24 मार्च 2019 रोजी मतदान होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था: नगरपरिषदा: पालघर (जि. पालघर), सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलढाणा). जिल्हा परिषदा: पुणे- देहुगाव-लोहगाव निवडणूक विभाग (ता. हवेली). पंचायत समित्या: बागलाण (जि. नाशिक)- पठावे दिगर निर्वाचक गण आणि मोहाडी (जि. भंडारा)- वरठी व पालोरा.सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या :  ठाणे- 3,  रायगड- 20, रत्नागिरी- 11, सिंधुदुर्ग- 4,नाशिक- 48, धुळे- 18, जळगाव- 12, अहमदगनर- 3, नंदुरबार- 5, पुणे- 20, सोलापूर- 8, सातारा- 44, कोल्हापूर- 3, औरंगाबाद-3,  उस्मानाबाद- 2, परभणी- 1, अमरावती- 1, अकोला- 14, वाशीम- 32, बुलडाणा- 2, नागपूर- 2, वर्धा- 298, चंद्रपूर- 1 आणि गडचिरोली- 2. एकूण- 557.पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा: ठाणे- 1, रायगड- 15, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 4, धुळे- 1,जळगाव- 2, अहमदगनर- 4, नंदुरबार- 1, पुणे- 3, सोलापूर- 3, सातारा- 6, सांगली- 2, कोल्हापूर- 8, बीड- 1, नांदेड- 6,उस्मानाबाद- 2, परभणी- 2, अकोला- 3, यवतमाळ- 1, वाशीम- 6, बुलडाणा- 2, नागपूर- 6. एकूण- 82.

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र