आंबेरीत रानटी हत्तींचे प्रशिक्षण सुरू

By Admin | Updated: February 13, 2015 22:56 IST2015-02-13T22:14:19+5:302015-02-13T22:56:17+5:30

प्रशिक्षित हत्तींचे सहाय्य : तिसऱ्या क्रॉलचे काम युद्धपातळीवर

Initially training of wild elephants is going on | आंबेरीत रानटी हत्तींचे प्रशिक्षण सुरू

आंबेरीत रानटी हत्तींचे प्रशिक्षण सुरू

माणगाव : माणगाव आंबेरी वनविभागाच्या तळावर दोन रानटी हत्ती डॉ. उमाशंकर यांच्या टीमने क्रॉलबंद केले. माणगाव खोऱ्यात राहिंलेला तिसरा हत्ती पकडून त्यालाही जेरबंद करण्यासाठी पाळीव हत्तीच्या मदतीनेच क्रॉल उभारणी युद्धपातळीवर सुरू आहे. क्रॉलला लागणारी झाडेही पुळास- नानेली भागातून आणण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तसेच या क्रॉलबांधणीसाठी प्रशिक्षीत हत्ती मदत करत असून, माहूत दोन रानटी हत्तींना प्रशिक्षणही देत आहेत.माणगाव परिसरात फिरणारा तिसरा रानटी हत्ती या दोन्ही हत्तींपेक्षा मोठा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, मादी असेल की टस्कर याबाबत साशंकताच व्यक्त केली जाते. परंतु मादी असो वा टस्कर, त्याला जेरबंद करण्याची तयारी जोरदार सुरू असून, येत्या एक-दोन दिवसात तोही हत्ती आंबेरी वन तळावर क्रॉलमध्ये बंद होईल, अशी खात्री डॉ. उमाशंकर यांच्या टीमला आहे. क्रॉल उभारण्यासाठी पाळीव हत्तीची मदत, पूर्वीचे दोन्ही क्रॉल जेसीबी व माणसांनी मिळून उभे केले होते. आता मात्र तिसरा क्रॉल उभारणीसाठी जेसीबी, माणसे याचबरोबर हत्तींचाही उपयोग करण्यात येणार असून, त्याला लागणारी मोठमोठी लाकडे गजेंद्र हा पाळीव हत्ती लीलया आपल्या सोंडेने घेऊन क्रॉल रचतो. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत क्रॉल उभारणी होऊन एक-दोन दिवसात तिसरा हत्ती पकड मोहीम राबविली जाईल. क्रॉल उभारणीसाठी जिल्हानियोजन निधीचा वापरआंबेरी येथे रानटी हत्तींना ठेवण्यासाठी तीन क्रॉल बांधण्यात आले आहेत. तिन्ही क्रॉल उभारणीसाठी जिल्हा नियोजनचा निधी वापरल्याचे उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी सांगितले. जिल्हा नियोजन मंडळातून देण्यात येणारे पंधरा लाख रुपये मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
बघ्यांची गर्दीपाळीव तसेच रानटी जेरबंद झालेले हत्ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ येतात. मात्र, आंबेरी वन विभागाने त्या तळाला संपूर्ण झावळांनी बंदिस्त केले आहेत. त्याचा आधार घेत ग्रामस्थ हत्ती पाहताना दिसून येत आहेत. वनविभागाचे कर्मचारी त्यांना वेळोवेळी सूचना देत असतात. त्यामुळे ग्रामस्थांनीही सहकार्य करावे, जेणेकरून रानटी हत्ती बिथरू नयेत, असे वनविभागाने सांगितले आहे.
तिसरा हत्ती याच भागात
तिसरा हत्ती नानेली- निवजे- तुळसुली याच भागात वावरणारा असल्यामुळे हत्ती शोधमोहीम सुरू होईल. तेव्हा तो या तीन गावातील डोंगरातच सापडेल, असा ग्रामस्थांचा कयास आहे. तिसरा हत्ती जेरबंद होईल, तेव्हा माणगाव खोरे हत्तीमुक्त होईल. हत्तींमुळे होणारा त्रास, नुकसान यापासून मुक्ती मिळेल. त्यामुळे ही मोहीम लवकर पूर्ण व्हावी, अशीच शेतकऱ्यांची इच्छा आहे. (प्रतिनिधी)


दोन्ही रानटी हत्तींची सलगी
दोन्ही रानटी हत्ती पूर्वी बरोबरीनेच फिरत असल्यामुळे एकाच ठिकाणी दोन क्रॉलमध्ये बंदिस्त होऊन सोंडेच्या स्पर्शाने एकमेकांची विचारपूस करताना दिसतात. एकच हत्ती होता, त्यावेळी तो खूप आक्रमक वाटत होता. मात्र, दोन्ही हत्ती एकत्र आल्यामुळे काहीसे शांत दिसत होते.
पाण्याची टाकी उखडून टाकली
सोमवारी पकडलेल्या रानटी हत्तीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी जमिनीत पुरून ठेवलेली प्लास्टिकची टाकी हत्तीने सोंडेने खेचून दिली. त्यामुळे वनविभागाने दोन्ही हत्तींसाठी पिण्याच्या पाण्यासाठी सिमेंटच्या टाक्या जमिनीत पुरण्यात आल्या.
माहुतांकडून रानटी हत्तींना दिल्या जातात सूचना
रानटी हत्तींची सेवा करतानाच त्यांना विविध सूचनाही माहुत करतात. त्यांना लागणारे खाद्य घालणे, पाणी देणे, त्यांच्या अंगावर पाण्याचा फवारा मारीत राहणे. जेणेकरून दोन्ही हत्ती लवकरात लवकर माणसाळतील, या दृष्टीने त्यांना हाताळण्यात येत आहे.

Web Title: Initially training of wild elephants is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.