एकनाथ खडसेंकडून युतीचे संकेत, वरिष्ठ पातळीवरील चर्चेतून माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 11:40 AM2019-09-26T11:40:40+5:302019-09-26T11:41:26+5:30

युती संदर्भातील बैठका सुरू आहेत, मागच्या कालखंडात युती तोडणं यात मोठे मतमतांतर होतं.

Information from Eknath Khadse on Alliance bjp-shiv sena signals, senior level discussions of delhi | एकनाथ खडसेंकडून युतीचे संकेत, वरिष्ठ पातळीवरील चर्चेतून माहिती

एकनाथ खडसेंकडून युतीचे संकेत, वरिष्ठ पातळीवरील चर्चेतून माहिती

Next

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री दिल्लीला युतीच्या बैठकीसाठी गेलेले आहेत. त्यामुळे युतीचा निर्णय होईल का, याकडे डोळे लावून बसलेल्या राज्यातील भावी उमेदवार आणि कार्यकर्त्यांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. मात्र, तत्पूर्वीच भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी युती होईल, असे संकेत मिळत असल्याचं म्हटलंय.

सन 2014 मध्ये युती तुटली, पण सध्या युती संदर्भातील बैठका सुरू आहेत, मागच्या कालखंडात युती तोडणं यात मोठं मतमतांतर होतं. कारण, युती ही 25 वर्षांपूर्वीची होती. युती तुटल्याचा निर्णय मी पक्षाच्या आदेशानुसार जाहीर केला होता. मी विरोधी पक्षनेता होतो. त्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर होती. आता, सध्याच्या वातावरणानुसार युती होईल, असं मला वाटतंय. वरिष्ठ पातळीवरील चर्चेतून मला जी माहिती आहे, त्यानुसार युतीचे संकेत आहेत. चर्चेतील काही विषयात देवाण-घेवाण, यामध्ये विलंब लागत असतो. चर्चेतून लवकर निर्णय होत नाहीत, लवकर निर्णय व्हावा हेच, आम्हाला वाटतंय, असे एकनाथ खडसेंनी सांगितले. तसेच, पक्षात तुमचा हवा तेवढा सक्रीय सहभाग नसतो, असे विचारले असता. गरज असल्यास मला देवेंद्र फडणवीस बोलवतात, असे खडसेंनी सांगितले. 

पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला मी उपस्थित असतो, दिल्लीच्याही बैठकीला उपस्थित होतो. अलीकडच्या कालखंडात देवेंद्र फडणवीस आले अन् त्यांची त्यांची नवीन टीम बनवली. त्यांच्या काही नवीन कल्पना आहेत. आवश्यकता नसल्यास मीही उत्तर महाराष्ट्र, जळगाव आणि माझ्या मतदारसंघात जात असतो. मी लोकांच्या गाठीभेठी घेतोच, असे खडसेंनी म्हटले. दरम्यान, एकीकडे पुणे जिल्ह्यात पूरस्थितीने थैमान घातले असता मुख्यमंत्री दिल्ली वारीत व्यस्त आहेत. यावरुन, सरकारला पूरस्थितीचं गांभीर्य नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.  
 

Web Title: Information from Eknath Khadse on Alliance bjp-shiv sena signals, senior level discussions of delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.